Posts

Showing posts from 2020

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी निवड जाहीर

Image
              निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी मान.वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षांकरिता (२०२०-२०२५) महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्हातून पर्यावरण संबंधी आवड व त्यांचे काम पाहून पदभार निवड जाहीर केली आहे.आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.  राज्यात पुढील पाच वर्षात पर्यावरणा संबंधित वृक्ष लागवड व  संवर्धन तसेच प्रदूषण निवारण करण्याचे कामास गती मिळण्यासाठी या सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यभरातील विविध जिल्हातील राज्य पदाधिकारी खालील प्रमाणे - अध्यक्ष १)वृक्षमित्र आबासाहेब मोरे. अहमदनगर. कार्याध्यक्ष(१३) १) विलास दत्ताराम महाडिक-रत्नागिरी, २) अलका अनिल गव्हाणे-औरंगाबाद, ३) उमाजी यादवराव बिसेन-भंडारा, ४) उल्का जगन्नाथ कुरणे-नाशिक, ५) गोरखनाथ दगडू शिंदे-पुण, ६) नवनाथ राजाराम लाड-सांगली, ७) प्रमोद दत्तात्रय काकडे-पुणे, ८) प्रियवंदा भिकाजी तांबोटकर-रायगड, ९) मुनीश

पावसाळ्यात कोकणात आढळणारी अळंबी चे प्रकार

Image
कोकणात जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडत असतो व भर पावसातच अत्यंत चवदार, भरपूर प्रथिनांचा स्त्रोत असलेले चार ते पाच अळंबीचे प्रकार  कोकणातील जंगलात रुजून येतात. विशेष म्हणजे सतत पाऊस पडला व तापमान २० ते २३°सें.ग्रे. पर्यंत खाली आले की हे अळंबीचे प्रकार रानातील जाळीत किंवा वाळवीच्या ठिकाणी रूजतात. यातील एक दोन प्रजातींच्या स्पाॅनचे कॅरीअर वाळवी आहे. स्थानिक गुराखी, शेतकरी यांना दरवर्षी अळंबी कुठे कुठे रूजते त्या जागा माहित असतात.आम्ही १० वी पर्यंत असताना आमच्याकडे गुरे असल्यामुळे ते चारविण्यासाठी आमच्या परसात किंवा मित्रांबरोबर डोंगरात गुरे चारण्यासाठी सकाळी व  सायंकाळी गुरे घेऊन जावे लागत असे.जुलै ऑगस्ट महिन्यात ही अळंबी आम्ही सर्व गुराखी डोंगरातल्या खैराच्या झाडाखाली किंवा इतर झाडांचे बुंदे तसेच वारुळे शोधत फिरत असू की कोणाला कोठे अळंबी मिळते हे पाहण्यासाठी. कोणाला चितळी अळंबी ही कधी पूर्ण उगवणार हे माहीत असते,त्याप्रमाणे आम्ही तेथे झाडाचा पाला बाजूला ठेवून देत असू.याचे कारण ही जेणेकरून दुसऱ्या कोणीही व्यक्ती ने ती नेऊ नये. पाला अळंबी च्या जवळ असेल तर त्या अळंबी ला कोणी हात लावीत नसे, म्हण

आपल्या जैविविधतेचे जतन करा.

Image
  जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, ह्या उक्ती प्रमाणे सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमी आपली जैवविविधता कशी अबाधित राहील व सर्व जनतेला कसे समजेल हे पहात आहेत.महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे काम करीत आली आहे.      वृक्षमित्र मान.आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ  गेली १६ वर्षे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनाचे काम करीत आली आहे.प्रत्येक जिल्ह्यात मंडळाच्या शाखा कार्यरत आहेत.आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्टलोकसहभागातून निश्चित करण्यात आले आहे.कोरोना लॉक डाऊन मध्ये लोकांना घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या परसदारी,कुंडीत,वेगवेगळी झाडे लावावीत, आपली प्रतिकारशक्ती वाढवावी ,झाडे जोपासावीत व ऑक्सिजन चे प्रमाण वाढवावे असा संदेश देण्यात आला आहे.आपणा सर्व नागरिकांना देशी-विदेशी झाडांचे फायदे तोटे समजावेत यासाठी सोशल मीडियावर पर्यावरण संबंधित फिरणारी आवश्यक माहिती आपणास ही माहिती असावी यासाठी देत आहे. देशी वृक्ष-  अनेकवृक्ष पश्चिमघाट

घरच्या घरी करा प्राणवायूची सोय, घर अंगण शेत तुमचे मदत आमची

Image
 घरी करा प्राणवायूची सोय   घर अंगण शेत तुमचे मदत आमची   हवा (ऑक्सिजन),पाणी व अन्न या माणसाच्या व प्राणीसृष्टीच्या उतरत्या क्रमाने जीवनावश्यक गरजा आहेत.पाणी व अन्नाशिवाय आपण बोटावर मोजण्याइतक्या दिवस जगू शकू पण हवेशिवाय आपण क्षणभरही जगू शकत नाही.हवा ही सर्वच सजीवांची मुलभूत गरज आहे म्हणून सृष्टीत हवेची योजना केलेली आहे.हवा हे मिश्रण आहे.हवेतला कर्ब व नायट्रोजन वनस्पतींसाठी महत्वाचा तर ऑक्सिजन प्राण्यांसाठी महत्वाचा.कार्बनी संयुगाचे हवेतले प्रमाण वाढल्यास तिला दूषित हवा म्हणतात.दूषित हवा माणसांसाठी विषसमान आहे.दूषित हवेमुळे श्वसनाच्या विकारात वाढ होते व माणसाचे सरासरी आयुर्मान कमी होते.दूषित हवेमुळे वनस्पती सृष्टीचीही हानी होते.शुद्ध हवा ही निसर्गाची देण आहे पण माणसाकडून या सृष्टीघरच्या देणगीला कर्बाचं काळं गालबोट लागलेलं आहे.       हवा शुद्ध राखायची असेल तर आपल्याला फक्त वनस्पतीच मदत करू शकतात कारण जीवसृष्टीत कर्ब पदार्थ शोषून घेणे व ऑक्सिजनची अर्थात प्राणवायूची निर्मिती करणे हे केवळ वनस्पतीच करू शकतात.ऑक्सिजन हे अधातूवर्गीय नैसर्गिक मूलद्रव्य आहे पण ते निसर्गात

५ जून जागतिक पर्यावरण दिन

Image
                         आज ५ जून पर्यावरण दिन पर्यावरणामुळेच सजीव प्राणी जिवंत राहू शकले आहेत.याच पर्यावरणाचा वायू प्रदूषण,जल प्रदूषण,मृदा प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण यांनी ह्रास केला आहे. जगातील १०० हून अधिक देश ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात.पर्यावरणाचे महत्त्व आता सर्वांना पटू लागले आहे.पृथ्वीवरील हिरवे आच्छादन कमी झाले आहे म्हणजेच वने नष्ट होत चालली आहेत,त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.तापमान वाढीला आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिकरण, याचाच परिणाम म्हणजे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन वादळे,चक्रीवादळात रूपांतर होऊन अतिवृष्टी, सजीवांची हानी,वित्तहानी असे अने संकटे उभी राहत आहेत.कालचेच उदाहरण घ्या,निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी, मुंबई,पुणे व इतर अनेक ठिकाणी वित्त हानी झाली अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणातील बागायती शेती आणि सर्वच देशातील बागायती शेती अति उष्णतेमुळे धोक्यात आली आहे.आधीच कोरोना महामारीने जगातील अनेक देशाना ग्रासलेले आहे. निसर्गाची ज्या पद्धतीने मानवाने हानी केलेली आहे त्याचा बदला तर निसर्ग घेत नाही ना ? अशी शंका येत आहे.कोरोना महामारीन

चिपळूणातील -पेढे मोरेवाडी येथील डोंगर हिरवाईने सजणार.

Image
          श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग जि. रायगड यांच्या प्रेरणेने श्री समर्थ बैठक चिपळूण यातील पेढे-माळीवाडी,मोरेवाडी,कुंभारवाडी व चिपळूण मधील काही सदस्यांनी पेढे-मोरेवाडी डोंगरावर स्वतः वृक्ष लागवड केली आहे,स्वतः लहान मुलांप्रमाणे जोपासना करून ती झाडे वाढविली आहेत. पेढे मोरेवाडी येथील डोंगर हा तीव्र उताराचा माणसांना सुद्धा चालताना तोल जातो की काय अशा प्रकारचा.पूर्वी या ठिकाणी या वाडीतील गुरे चरण्यासाठी  हा मोकळा माळरान वापरला जायचा. आज गुरे कमी झाली,वाडीतील मुले चिपळूण बाजारात कामाला लागली  त्यामुळे गुरे चारणे व पाळणे कमी झाले. ह्या माळावर  श्री समर्थ बैठक चिपळूण परिवारातील श्री सदस्य यांनी हा उजाड माळरान हिरवे करण्याची तयारी केली.व करणारच या इर्षेने. मागील 3 वर्षांपासून मी हे स्वतः तेथे जाऊन त्या लोकांशी चर्चा करून त्यांची अपार मेहनत पहात आलो आहे. त्या लहान झाडांची लहान मुलांप्रमाणे जोपासना चालू आहे. तीव्र उतार असल्याने दरवर्षी झाडाच्या बुंध्यात घातलेली माती पावसाच्या पाण्याबरोबर खाली वाहून येते. तरीही झाडे जगविणे व त्यांचे संगोपन करणे हे श्री समर्थ बैठक

शासनाने कोकणासाठी "वणवा मुक्त गाव" पुरस्कार जाहीर करावा.

Image
    शासनाने कोकणासाठी “वणवामुक्त गाव “ पुरस्कार जाहीर करणेबाबत प्रति, मान. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन   यांसी,                            ग्रामविकासासाठी विविध अभियान व उपक्रम राबवीत असताना प्रत्येक गावामध्ये “ वणवामुक्त गाव ” यासारखे अभियान राबविणे आज काळाची गरज आहे. ‌ आज ग्लोबल वॉर्मिंगच्या भीषण संकटात वणव्यामुळे जंगले नष्ट होणे माणसाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. वणवा डोंगर व जंगल प्रदेश उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होतात. ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. किंबहुना वणवा विझविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींची जीवितहानी सुद्धा नोंदविण्यात आलेली आहे. कित्येक बागायतदार मोठय़ा मेहनतीने खूप मोठाले खर्च करून आंबा, काजू, सीताफळ, साग, बांबू, इ. लागवड करतात. त्यात त्यांना यश येऊ लागले आहे असे वाटावे, तोपर्यंत वणव्यांनी त्या बागेचा कोळसा झालेला पाहण्याची वेळ अनेकांवर आली आहे.                वृक्षच आहेत वसुंधरेचा प्

बाबा आमटे यांचे " आनंदवन "

Image
बाबा आमटे यांचे समाधीस्थळ ( कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढल्यामुळे तोंडाला बांदावयाचे मास्क , मेडीकल येथे कमी प्रमाणात उपलब्द्द होत होते. त्याच दरम्यान पेपर मध्ये बातमी वाचावयास मिळाली की बाबा आमटे यांच्या आनंदवन मधून कुष्ठरोग्यांच्या मार्फत त्यांच्या हातमागावरील त्यांनी तयार केलेल्या कापडापासून ५ लाख मास्क ते तयार करून देणार . हि बातमी वाचली ,लगेच माझ्या डोळ्यासमोर आनंदवन दिसू लागले. फेब्रुवारीत आम्ही आनंदवन,हेमलकसा,सोमनाथ येथे जावून आलो होतो. )            1 फेब्रुवारी 2020 ला आम्ही आनंदवन येथे जाण्यासाठी निघालो,आनंदवन येथे पोचल्यावर आम्हाला अगोदर बुकिंग केल्यामुळे आम्हाला रूम देण्यात आली.रूममध्ये सामान ठेवून फ्रेश होवून जेवणाची व्यवस्था ज्या हॉल मध्ये केली आहे तेथे  जेवण आटोपून आम्ही आनंदवन पाहण्यासाठी बाहेर पडलो.तेथील कार्यालयात जावून आम्ही सर्वांची नावे नोंद वहीत मोबाईल नंबर सह नोंदणी केली.त्यांनी आनंदवन पाहण्यासाठी गाईड आम्हाला दिला. गाईड सुद्धा बाबा आमटे यांच्या सहवासात वाढलेले काका देऊन ते तुम्हाला माहिती देतील असे सांगण्यात आले.ते सुद्धा कुष्ठरोगी म्हणून बाब