Posts

Showing posts from February, 2023

खाज कुहिली उपयोग व गुणधर्म

Image
  ( निसर्गतः   5 हजार वर्षांपासून आयुर्वेदात 'कवच ,कपीकच्छु ,आत्मगुप्त आदी नावाने ही खाज कुहिली वनौषधी परिचित आहे.पुरुषार्थ वाढवणारी बलवर्धक असणारी हे कवच बीज मानवासाहित माकड,वानर यांना ही प्रिय आहे हे विशेष. )                         -गैरसमज व भीतीपोटी सर्व परिचित असलेली खाज कुहीली (कवच)ची वेल आता बांधावरून दिसेनाशी होत आहे.वाळलेल्या शेंगा वर बारीक लव असते ज्यास चुकून स्पर्श झाला की अंगास प्रचंड खाज येते ,या एकमेव गुणधर्मामुळे शेतकरी वा ज्यांच्या कुंपणावर ही वेल उगते ती  वेल नष्ट करण्याचा कल ग्रामीण भागात वाढत आहे व याचा परिपाक आता हे आरोग्यदायी कवच च असुरक्षित झाले आहे.निसर्गतः   5 हजार वर्षांपासून आयुर्वेदात 'कवच ,कपीकच्छु ,आत्मगुप्त आदी नावाने ही वनौषधी परिचित आहे.पुरुषार्थ वाढवणारी बल वर्धक असणारी हे कवच बीज मानवासाहित माकड,वानर यांना ही प्रिय आहे हे विशेष.या वनस्पतीच्या शेंगा मधील काळे बिज हे 100हुन अधिक आयुर्वेदिक औषधांत वापरतात.पूर्वीच्या काळी राजे महाराजे बलवान होण्यासाठि तर ऋषी ,मुनी, ओज शक्ती वाढवण्यासाठी तर  पैलवान  बलदंड शरीर कमविण्यासाठी खाज कुहीली चे बीज वि