Posts

Showing posts from April, 2024

रुई चे पान -जैवविविधतेसाठी "विषारी रेस्टॉरंट"

Image
जैवविविधतेसाठी "विषारी रेस्टॉरंट" असलेल्या रुई चे पान तोडतायं...घ्या काळजी फुलपाखरांची. - भगवान हनुमान व शनी देव यांना प्रिय असलेली रुईची पाने व फुलं यांचा हार बनवून मोठया प्रमाणात भाविक हनुमान व शनी देवास व इतर दिवशी ही विधीत अर्पण करतात. रुई ची झुडूप सर्वत्र व विपुल मात्रेत आढळत असले तरी त्या पानांच्या खालच्या बाजूस बऱ्याचदा विविध फुलपाखरे यांची अंडी व कोष असतो व ही पाने तोडल्याने सदर फुलपाखरांची अंडी व कोष धोक्यात येऊन त्याचा जीवनक्रम पूर्ण होण्याआधीच संपतो व पर्यावरणाच्या आरोग्याचे सूचक असलेले फुलपाखरे हळूहळू नष्ट होत आहे,त्यात हे ही एक कारण असल्याचे सिल्लोड येथील जैवविविधता संशोधक व संवर्धक डॉ.संतोष पाटील यानी यावर विशेष अध्ययन केले आहे.कॉमन टायगर,प्लेन टायगर,स्ट्रीप टायगर ,ब्लू टायगर, ग्लोसी टायगर, मोनार्क आदी प्रजातींची फुलपाखरे फक्त रुई वर च पांनाच्या खालच्या बाजूस खूप सूक्ष्म अंडी घालतात, कोष ही विकसित होतो व अळी च्या अवस्थेत ही फुलपाखरं रूई ची विषारी पाने खाते व पुढे त्याचे उडणारे फुलपाखरूत रूपांतर होते.रुईवर खूप मोठी जैवविविधता अवलं