Posts

Showing posts from March, 2023

@ निसर्गातील रंगपंचमी.@

Image
                   वसंताच्या आगमनाचे जंगलात जणू रंगपंचमी साजरी होत आहे. झाडांची नविन पालवी,फुले सुद्धा विविध प्रकारच्या रंगात येत असतात.जंगलात फिरताना वेगवेगळ्या झाडांची वेगवेगळी फुले त्यांचे वेगवेगळे सुंदर सुवास आपले लक्ष वेधून घेतात.जंगलचा वणवा म्हणजे "फ्लेम ऑफ फॉरेस्ट " अर्थात पळस आता बहरू लागला.डॉ . संतोष पाटील सिल्लोड यांनी अजंठा जंगलात पिवळा पळस यांचे फोटो पाठविले आहेत.पूर्वीं फुलांपासून बनविले गेलेल्या रंगांनी अजंठा लेणीतील रंगकाम केलेलं  आजही टिकून आहे.कोकणात पिवळा पळस नजरेस पडत नाहीत. पळसाला पक्षांचा ज्यूस बार ज्यास म्हटले जाते. काटेसावर ही गर्द गुलाबी छटा व फेंट गुलाबी व कोकणात काही ठिकाणी पिवळी काटेसावर नजरेस पडते. वनात ही झाडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत व आपले रंग उधळत आहे. पांगारा आपल्या आकर्षक रंगांनी व मकरंद यांनी भरलेली फुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.वर्षभरात नजरेस न पडणारे पक्षी थव्याने व त्यांच्या किलबिलाटाने या फुललेल्या झाडावर हमखास दिसून येतात. बुलबुल,फुलटोच्या ,शिंजिर,मैना,खार,पोपट या सारखे पक्षी ,फुलपाखरे,वटवाघुळे ,मधमाशा काटे सावरच्या फुलांचा परा