Posts

Showing posts from May, 2023

*काजव्यांचे शेती मधील योगदान.*

Image
*काजव्यांचे शेती मधील योगदान.*    पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. आईच्या मामाकडल्या घरी मी ह्या काजव्यांच्या मागे पळत असे आणि दहा पंधरा मिनिटात जवळपास शंभरएक काजवे पकडून ते बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवून आम्ही लहान मुले मज्जा करत असायचो.      अवघ्या तीस वर्षात हे काजवे अश्या पद्धतीनं गायब होतील याचा त्या काळी विचार पण केला नव्हता. आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब. हे काजवे गेले तरी कुठे??? त्यांचं भविष्य काय?? त्यांचा जीवनक्रम कसा असतो?? काजवे काय खातात?? ते कसे चमकतात??        *तर काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात,  जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जातं. पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामधे किव्वा पाणथळ जागांच्या शेजारी, किव्वा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळा मध्ये दिली जातात. काजव्याची अंडी व अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून कजव्याची अळी बाह