५ जून जागतिक पर्यावरण दिन

                         आज ५ जून पर्यावरण दिन
पर्यावरणामुळेच सजीव प्राणी जिवंत राहू शकले आहेत.याच पर्यावरणाचा वायू प्रदूषण,जल प्रदूषण,मृदा प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण यांनी ह्रास केला आहे. जगातील १०० हून अधिक देश ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात.पर्यावरणाचे महत्त्व आता सर्वांना पटू लागले आहे.पृथ्वीवरील हिरवे आच्छादन कमी झाले आहे म्हणजेच वने नष्ट होत चालली आहेत,त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.तापमान वाढीला आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिकरण, याचाच परिणाम म्हणजे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन वादळे,चक्रीवादळात रूपांतर होऊन अतिवृष्टी, सजीवांची हानी,वित्तहानी असे अने संकटे उभी राहत आहेत.कालचेच उदाहरण घ्या,निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी, मुंबई,पुणे व इतर अनेक ठिकाणी वित्त हानी झाली अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणातील बागायती शेती आणि सर्वच देशातील बागायती शेती अति उष्णतेमुळे धोक्यात आली आहे.आधीच कोरोना महामारीने जगातील अनेक देशाना ग्रासलेले आहे. निसर्गाची ज्या पद्धतीने मानवाने हानी केलेली आहे त्याचा बदला तर निसर्ग घेत नाही ना ? अशी शंका येत आहे.कोरोना महामारीने संपूर्ण मानवजातीला लॉकडाऊन करून घ्यावे लागले.या लॉकडाऊन च्या काळात निसर्गाने स्वतःला  थोडे सुधारून घेतले. मोठमोठ्या शहरातील हवेचे प्रदूषण कमी झाले ओझोन वायूचा थर दाट झाला.  अनेक किलोमीटर वरील भाग आता दिसू लागला ,पाण्याचे प्रदूषण कमी झाले नद्या स्वच्छ झाल्या,वन्य प्राणी सगळीकडे मुक्त संचार करू लागली.ध्वनी प्रदूषण कमी झाले.कोरोना विषाणू मुळे हे सर्व झाले.एकामागून एक अशी अनेक संकटे येत आहेत   निसर्ग चक्राची साखळी आपण तोडली आहे प्रत्येक सजीव प्रत्येकावर अवलंबून असतो हे आपणास माहिती आहे ,त्यातच टोळधाडी मुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.त्यांना आवर घालणारे सजीव कमी आहेत (किटकभक्षी पक्षी)६
 मागे वळून पाहिले की आपली पृथ्वी कशी होती,पृथ्वी वर दाट अशी सर्व प्रकारची झाडे होती,पूर्वी फॅन,एसी शिवाय माणूस झोपू शकत होता,पण आता ..… कोरोना ने सर्व मानवजातीला शिकवले की आपल्या गरजा किती ? पर्यावरणा चे महत्त्व आता शाळेत व युवा पिढीला ,सर्व समाजाला समजले आहेत. कोरोना ची लक्षणे पाहिली की त्यातील एक लक्षण श्वास घेण्यास अडचण म्हणजेच आपणास पूर्ण क्षमतेने ऑक्सीजन मिळत नाही,यासाठी सकाळी मॉर्निंग वॉकला लोक बाहेर पडतात हवेमध्ये ऑक्सीजन चे प्रमाण कमी,पूर्वी समजा १००℅ ऑक्सीजन मिळत असेल तर तो आता ८०% इतका मिळतो.त्यामुळे श्वास घेताना तो आपणास पूर्ण क्षमतेने मिळत नाही.तो मिळवावयाचा असेल तर वृक्षांची लागवड करून त्याची जोपासना केली पाहिजे. पूर्वी च्या संतांनी सुद्धा वृक्षाचे महत्व त्यांच्या अभंगामध्ये पटवून दिले आहे.संत तुकाराम महाराज यांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे" ... या त्यांच्या अभंगातून सांगितले आहे. पूर्वी मानव निसर्गाची पूजा करत असे, निसर्गाला देव मानत असत. संस्कृतमध्ये पिंपळाच्या झाडाला अश्वथा म्हटले जाते. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. गौतम बुद्धांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले असल्यामुळे याला बोधी वृक्ष असेही म्हणतात. श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखालीच देह ठेवला. त्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली. या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास आहे. महिला पुत्र प्राप्तीसाठी या झाडाची पूजा करतात.    
      वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही पिंपळाचे झाड खूप उपयोगी मानले जाते. सर्वसाधारणपणे झाडे दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साइड सोडतात. वैज्ञानिकांच्या शोधानुसार हे एकमेव असे झाड आहे, जे दिवसरात्र 24 तास ऑक्सिजन देते. या झाडाच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तीची प्राणशक्ती वाढते. या झाडाची सावली उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहते. या व्यतिरिक्त या झाडची पाने, फुले, फळ औषधी गुणांनी भरलेले आहेत.याशिवाय वड, तुळस, कडुनिंब,नांदूरकी,पिपर्णी  अशा प्रकारच्या वनस्पती आपल्या परिसराच्या आजूबाजूला हव्यात. जे लोक सदनिकेमध्ये राहतात त्यांनी कुंडीत तुळशी ची झाडे लावून त्याची देखभाल करावी, ज्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल त्यांनी वरील वृक्षांची लागवड करावी.किंवा ज्या झाडाला पाने जास्त असतील त्यांनी देशी झाडे लावून ऑक्सिजनचे प्रमाण कसे वाढेल ते पाहावे. याचा परिणाम असा होईल की आजारी माणसाला ऑक्सिजन भरपूर मिळेल,त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढेल.पर्यावरण दिनानिमित्त आपण स्थानिक प्रजातिची झाडे लावली पाहिजेत.,स्वतःच्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे, स्थानिक सजीवांचे अधिवास समजून घेऊन त्यांचे रक्षण केले पाहिजे.
               
              विलास दत्ताराम महाडीक
कार्याध्यक्ष-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ  मोबा.९४२२३७६४३५



Comments

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी निवड जाहीर