Posts

Showing posts from September, 2023

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म

Image
 *गणेश पूजनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पत्री  (पानाबद्दल) काय म्हणते आपले आयुर्वेद? काय आहेत याचे फायदे ते पहा.                   या निमित्ताने आपण हे झाड समजून घ्याल व त्याची लागवड कराल अशी अपेक्षा आहे.                          २१ प्रकारच्या वनस्पतींची नावे -१)मधुमालती २)माका ३)बेल ४)दुर्वा ५)शमी ६)विष्णुकांत ७)आघाडा  ८)मंदार (रुई ) ९)तुळस १०)केवडा ११)जाई १२)बोर १३)धोत्रा १४)डोरली १५)कण्हेर १६)अर्जुन सादडा १७)डाळिंब  १८)मरवा १९)देवदार २०)पिंपळ २१)अगस्ती    खालील दिलेले उपचार तज्ञ व्यक्ती किंवा आयुर्वेद उपचार करणाऱ्या तज्ञाकडून प्रमाण व  पध्दत समजून घ्या.  *१. अगस्ती(हादगा)*              प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असते.  'अ ' जीवनसत्त्वाचे वनस्पतीज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.अगस्तीची पाने, फुले, साली यांच्या वापरामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप हे आजार  नाहीसे होतात.  *२