Posts

Showing posts from July, 2020

पावसाळ्यात कोकणात आढळणारी अळंबी चे प्रकार

Image
कोकणात जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडत असतो व भर पावसातच अत्यंत चवदार, भरपूर प्रथिनांचा स्त्रोत असलेले चार ते पाच अळंबीचे प्रकार  कोकणातील जंगलात रुजून येतात. विशेष म्हणजे सतत पाऊस पडला व तापमान २० ते २३°सें.ग्रे. पर्यंत खाली आले की हे अळंबीचे प्रकार रानातील जाळीत किंवा वाळवीच्या ठिकाणी रूजतात. यातील एक दोन प्रजातींच्या स्पाॅनचे कॅरीअर वाळवी आहे. स्थानिक गुराखी, शेतकरी यांना दरवर्षी अळंबी कुठे कुठे रूजते त्या जागा माहित असतात.आम्ही १० वी पर्यंत असताना आमच्याकडे गुरे असल्यामुळे ते चारविण्यासाठी आमच्या परसात किंवा मित्रांबरोबर डोंगरात गुरे चारण्यासाठी सकाळी व  सायंकाळी गुरे घेऊन जावे लागत असे.जुलै ऑगस्ट महिन्यात ही अळंबी आम्ही सर्व गुराखी डोंगरातल्या खैराच्या झाडाखाली किंवा इतर झाडांचे बुंदे तसेच वारुळे शोधत फिरत असू की कोणाला कोठे अळंबी मिळते हे पाहण्यासाठी. कोणाला चितळी अळंबी ही कधी पूर्ण उगवणार हे माहीत असते,त्याप्रमाणे आम्ही तेथे झाडाचा पाला बाजूला ठेवून देत असू.याचे कारण ही जेणेकरून दुसऱ्या कोणीही व्यक्ती ने ती नेऊ नये. पाला अळंबी च्या जवळ असेल तर त्या अळंबी ला कोणी हात लावीत नसे, म्हण

आपल्या जैविविधतेचे जतन करा.

Image
  जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, ह्या उक्ती प्रमाणे सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमी आपली जैवविविधता कशी अबाधित राहील व सर्व जनतेला कसे समजेल हे पहात आहेत.महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे काम करीत आली आहे.      वृक्षमित्र मान.आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ  गेली १६ वर्षे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनाचे काम करीत आली आहे.प्रत्येक जिल्ह्यात मंडळाच्या शाखा कार्यरत आहेत.आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्टलोकसहभागातून निश्चित करण्यात आले आहे.कोरोना लॉक डाऊन मध्ये लोकांना घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या परसदारी,कुंडीत,वेगवेगळी झाडे लावावीत, आपली प्रतिकारशक्ती वाढवावी ,झाडे जोपासावीत व ऑक्सिजन चे प्रमाण वाढवावे असा संदेश देण्यात आला आहे.आपणा सर्व नागरिकांना देशी-विदेशी झाडांचे फायदे तोटे समजावेत यासाठी सोशल मीडियावर पर्यावरण संबंधित फिरणारी आवश्यक माहिती आपणास ही माहिती असावी यासाठी देत आहे. देशी वृक्ष-  अनेकवृक्ष पश्चिमघाट