Posts

Showing posts from June, 2020

घरच्या घरी करा प्राणवायूची सोय, घर अंगण शेत तुमचे मदत आमची

Image
 घरी करा प्राणवायूची सोय   घर अंगण शेत तुमचे मदत आमची   हवा (ऑक्सिजन),पाणी व अन्न या माणसाच्या व प्राणीसृष्टीच्या उतरत्या क्रमाने जीवनावश्यक गरजा आहेत.पाणी व अन्नाशिवाय आपण बोटावर मोजण्याइतक्या दिवस जगू शकू पण हवेशिवाय आपण क्षणभरही जगू शकत नाही.हवा ही सर्वच सजीवांची मुलभूत गरज आहे म्हणून सृष्टीत हवेची योजना केलेली आहे.हवा हे मिश्रण आहे.हवेतला कर्ब व नायट्रोजन वनस्पतींसाठी महत्वाचा तर ऑक्सिजन प्राण्यांसाठी महत्वाचा.कार्बनी संयुगाचे हवेतले प्रमाण वाढल्यास तिला दूषित हवा म्हणतात.दूषित हवा माणसांसाठी विषसमान आहे.दूषित हवेमुळे श्वसनाच्या विकारात वाढ होते व माणसाचे सरासरी आयुर्मान कमी होते.दूषित हवेमुळे वनस्पती सृष्टीचीही हानी होते.शुद्ध हवा ही निसर्गाची देण आहे पण माणसाकडून या सृष्टीघरच्या देणगीला कर्बाचं काळं गालबोट लागलेलं आहे.       हवा शुद्ध राखायची असेल तर आपल्याला फक्त वनस्पतीच मदत करू शकतात कारण जीवसृष्टीत कर्ब पदार्थ शोषून घेणे व ऑक्सिजनची अर्थात प्राणवायूची निर्मिती करणे हे केवळ वनस्पतीच करू शकतात.ऑक्सिजन हे अधातूवर्गीय नैसर्गिक मूलद्रव्य आहे पण ते निसर्गात

५ जून जागतिक पर्यावरण दिन

Image
                         आज ५ जून पर्यावरण दिन पर्यावरणामुळेच सजीव प्राणी जिवंत राहू शकले आहेत.याच पर्यावरणाचा वायू प्रदूषण,जल प्रदूषण,मृदा प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण यांनी ह्रास केला आहे. जगातील १०० हून अधिक देश ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात.पर्यावरणाचे महत्त्व आता सर्वांना पटू लागले आहे.पृथ्वीवरील हिरवे आच्छादन कमी झाले आहे म्हणजेच वने नष्ट होत चालली आहेत,त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.तापमान वाढीला आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिकरण, याचाच परिणाम म्हणजे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन वादळे,चक्रीवादळात रूपांतर होऊन अतिवृष्टी, सजीवांची हानी,वित्तहानी असे अने संकटे उभी राहत आहेत.कालचेच उदाहरण घ्या,निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी, मुंबई,पुणे व इतर अनेक ठिकाणी वित्त हानी झाली अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणातील बागायती शेती आणि सर्वच देशातील बागायती शेती अति उष्णतेमुळे धोक्यात आली आहे.आधीच कोरोना महामारीने जगातील अनेक देशाना ग्रासलेले आहे. निसर्गाची ज्या पद्धतीने मानवाने हानी केलेली आहे त्याचा बदला तर निसर्ग घेत नाही ना ? अशी शंका येत आहे.कोरोना महामारीन