Posts

Showing posts from June, 2022

वाशिष्ठी खोरे-रमणीयता गेलीच,सुरक्षेचाही पत्ता नाही!

Image
निसर्ग संपन्न वाशिष्ठी नदीतील 8 एकरावर विस्तारलेले बेट. नदीतील फरशी पुलावरून दिसणारे विहंगम दृश्य. ( पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे.  त्या तळ्यामध्ये पूर्वी  वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले  फुलायची. ज्या लोकांना कामधंदा नव्हता, त्या लोकांना कमळे फुलायची तेव्हा चिपळूण मध्ये तसेच एस.टी. स्टँड वर काही लोक ,मुले कमळाची फुले विकून पैसे मिळवीत होते.कमळाची ही फुले तालुक्यातील लोक घराघरात घेऊन जात होती. नवरात्रात देवीला वेगवेगळी फुले चिपळूणकरांना मिळायची. ते तलाव भरून तेथे अपार्टमेंट उभ्या राहिल्या. हळूहळू तळी कमी होऊ लागली. पूर्वी जास्त पाऊस झाला की प्रथम पाणी तलावात पसरायचे नंतरच चिपळूण शहरात घुसायचे.)                                  चिपळूणला 21,22 जुलै 2021 ला महापूर आला आणि  चिपळूण ची बाजारपेठ ,आजूबाजूची काही गाव पाण्याखाली गेली.सर्वांचे गोळा केलेल्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले.पाऊस प्रचंड झाला,पूर्ण सह्याद्री खोऱ्यातून प्रचंड पाणी चिपळूणच्या दिशेने आले,वरील बाजूस धरणे असल्याने थोडा फटका कमी बसला .या महापुराने डोंगर भाग

जागतिक पर्यावरण दिन व वाढते तापमान

            ५ जून जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी हा दिन येतो, आपण पर्यावरण प्रेमी या दिवशी काही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण किंवा इतर नागरिकांमधून पर्यावरणाची जनजागृती करीत असतो.2022 चा हा उन्हाळा सर्वात कडक भासला. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसते आहे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. सिमेंट रस्ते,अपार्टमेंट यांची बांधकामे ही तर तापमानात भर घालणारी साधने आहेत. सकाळी ८-९ वाजल्यापासूनच घराबाहेर पडावेसे वाटत नाही.रस्ते तापण्यास सुरुवात होते. हे सर्व आधुनिकीकरण करीत असताना झाडांची कत्तल काही कमी होत नाही. कोकणातून होणारे ४ पदरी हायवे यासाठी तर झाडांची कत्तल काही विचारू नका.ज्या हद्दीपर्यंत ठेकेदाराला झाडे तोड करण्यास सांगितले जाते त्या हद्दीबाहेरील मोठी झाडे तोड करून नेत आहेत.काय म्हणावे या हव्यासाला?             विकास करणे म्हणजे झाडे तोडून तेथे चकाचक सिमेंट रस्ते,अपार्टमेंट बांधणे नव्हे. माणूस पण असा लहरी आहे ही गर्मी वाढली की झाडे कमी झालीत,जंगले कमी झालीत अस म्हणतील पण पावसाळ्यात आपण आपल्या हाताने १ तरी झाड लावूया अस म्हणून झाड लावणार नाहीत.आपण स्वतःला विचारा की आता किती व