Posts

Showing posts from March, 2020

चला निसर्ग जपूया !!!

Image
             कोरोना लॉकडाऊन मध्ये सर्व जनतेला घरात नजर कैदेत ठेवल्यासारखं वाटत आहे. स्वतः जवळ सर्व साधने असूनसुद्धा माणूस एकाकी झाला आहे. मला वेळ नाही असे म्हणणारे आता हे सर्व दिवस कसा घालवू ,काय करू अशा चिंतेत आहेत.हा लॉकडाऊन केव्हा संपतो याची वाट पहात आहेत. आपल्या पंतप्रधान मान.मोदी साहेब,मुख्यमंत्री मान.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून जनतेला काही दिवस घरात बसण्याचे सारखे आव्हान करीत आहेत.सर्व शासकीय यंत्रणा आपल्या जनतेच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत.तरीही काही हौशी मंडळी बाजारात गर्दी करीत आहेत.हे ही दिवस जातील.आपण प्रशासन सांगेल त्याप्रमाणे  ऐकू या.            ह्या कोरोना लॉकडाऊन मुळे पर्यावरण सुद्धा बरेच सुधारण्यासाठी मदतच होत आहे. खेडे गावात रस्ते मोकळे आहेत त्यामुळे जंगलातील प्राणी सध्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.रस्त्यावर कोणतेही वाहन नाही.ट्रेनची धडधड नाही. पक्ष्यांच्या किलबिलाट स्पष्ट ऐकू येतो आहे. पक्षी बिनधास्त पणे विहार करताना दिसत आहेत.ध्वनी प्रदूषण नाही, गाड्यांच्या धुरापासून सर्व भारत सध्या प्रदूषण  मुक्त आहे, नद्या सुध्दा मुक्