जागतिक पर्यटन दिना निमित्त
27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. चिपळूण तालुका रत्नागिरी जिल्हयातीलच नव्हे तर कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे. संपूर्ण क्षेत्रात आघाडीवर असणारे चिपळूण शहर आहे. सर्वधर्म समभावाचा सुरेख संगम चिपळूण तालुक्यामध्ये पहावयास मिळतो. चिपळूण मधील पर्यटन 1) ओवळी येथील मंदिर- मंदिर व देवळासभोती असणारी देव किंजळ झाडाची वनराई पहाण्या सारखी आहे. उंच निलगिरी सारखी सरळ वाढणारी झाडे ही झाडे फक्त या देवळाच्या परिसरात आहेत, बाहेर ही झाडे होत नाहीत असा गावकर्यांचा विश्वास व श्रद्धा आहे. 2) चिपळूण जवळील कळकवणे गावाशेजारी दादरचे श्रीराम-वरदायिनी मंदिर- दादर येथील श्रीदेवी रामवरदायिनीचे मंदिर भव्यदिव्य आणि देखणे आहे. जयपूर हून रामवरदायीनी, श्री वाघजाई देवी आणि श्री महिषासुरमर्दीनी यांच्या मूर्ती आणल्या आहेत देवींच्या घडविलेल्या मूर्ती, बारा íज्योतिर्लिंगांचे दर्शन, डोळे दिपवणारे रंगकाम, मंदिर परिसरातील देवराई, उद्यान वैशिष्ट्यपूर्ण आहे. 3) तिवरे येथील गंगाकुंड - तिवरे गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागात, खडकाळ नदी प्रव...