घरच्या घरी करा प्राणवायूची सोय, घर अंगण शेत तुमचे मदत आमची
घरी करा प्राणवायूची सोय घर अंगण शेत तुमचे मदत आमची
हवा (ऑक्सिजन),पाणी व अन्न या माणसाच्या व प्राणीसृष्टीच्या उतरत्या क्रमाने जीवनावश्यक गरजा आहेत.पाणी व अन्नाशिवाय आपण बोटावर मोजण्याइतक्या दिवस जगू शकू पण हवेशिवाय आपण क्षणभरही जगू शकत नाही.हवा ही सर्वच सजीवांची मुलभूत गरज आहे म्हणून सृष्टीत हवेची योजना केलेली आहे.हवा हे मिश्रण आहे.हवेतला कर्ब व नायट्रोजन वनस्पतींसाठी महत्वाचा तर ऑक्सिजन प्राण्यांसाठी महत्वाचा.कार्बनी संयुगाचे हवेतले प्रमाण वाढल्यास तिला दूषित हवा म्हणतात.दूषित हवा माणसांसाठी विषसमान आहे.दूषित हवेमुळे श्वसनाच्या विकारात वाढ होते व माणसाचे सरासरी आयुर्मान कमी होते.दूषित हवेमुळे वनस्पती सृष्टीचीही हानी होते.शुद्ध हवा ही निसर्गाची देण आहे पण माणसाकडून या सृष्टीघरच्या देणगीला कर्बाचं काळं गालबोट लागलेलं आहे.
हवा शुद्ध राखायची असेल तर आपल्याला फक्त वनस्पतीच मदत करू शकतात कारण जीवसृष्टीत कर्ब पदार्थ शोषून घेणे व ऑक्सिजनची अर्थात प्राणवायूची निर्मिती करणे हे केवळ वनस्पतीच करू शकतात.ऑक्सिजन हे अधातूवर्गीय नैसर्गिक मूलद्रव्य आहे पण ते निसर्गात स्वतंत्रपणे सापडत नाही.ऑक्सिजन हे क्रियाशील मूलद्रव्य असल्यामुळे ते केवळ रासायनिक संयुगातच दिसून येते.निसर्गात ऑक्सिजनची निर्मिती ही प्रकाश संश्लेषण क्रियेत होते अन् ही क्रिया केवळ हिरव्या वनस्पतीच करू शकतात.म्हणजेच शुद्ध हवेत प्राणवायूचे प्रमाण स्थिर राखायचे असेल तर वनस्पती महत्वाच्या आहेत.
मागच्या वर्षी अमेझॉन खो-यात जंगलाला लागलेल्या आगीत निसर्गाची व एकूणच जागतिक पर्यावरणाची खूप मोठी हानी झाली आहे.वातावरणातल्या एकूण ऑक्सिजनपैकी 15 ते 20% आॉक्सिजन एकट्या अमेझॉन खो-यात तयार होतो.आता हे जळालेले जंगल पुनर्स्थापित व्हायला पुढचे तीस ते चाळीस वर्षे लागतील शिवाय आगीच्या वेळी कोपर्निकस मॉनिटरिंग सर्वेनुसार अंदाज केलेला 228 मेगाटन कार्बनडायअॉक्साईड निसर्गात आला ,तो वेगळाच.म्हणूनच अमेझॉन जंगल जळताना ते एकट्या ब्राजीलचं जळत नव्हतं तर संपूर्ण जगाचं जळत होतं.आंतरराष्ट्रीय जी 7 परिषदेत बोलताना फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इम्यॕनुएल मॕकॉन म्हणाले होते की आपलं घर जळतंय.याचा अर्थ असा होतो की पर्यावरणीय समस्या ही आता एका देशापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जगाची झाली आहे.
ऑक्सिजन हा माणसासाठी प्राणवायू आहे.ऑक्सिजन निर्मितीसाठी वनस्पतींचे संरक्षण करणे महत्वाचे आहे.पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन आपली बाळे शाळेत जात आहेत किंवा कामासाठी घराबाहेर पडणारी माणसं पाठीवर आॉक्सिजन सिलेंडर अडकवून जात आहेत.ही कल्पना किती भयंकर वाटते ना ? पण ही कल्पना सत्यात उतरणार नाही ? हे कशावरून ?
आजच्या लेखात आपण प्रकाश संश्लेषणातून जास्तीत ऑक्सिजन निर्मिती करणा-या झाडेझुडपेवृक्षवेली यांची ओळख करून घेणार आहोत.घराभोवती व कामाच्या जागेभोवती केलेली वृक्ष लागवडच आपल्याला ताजी व शुद्ध हवा देऊ शकते.
कुंडी ,पत्र्याचे डबे ,फुटलेल्या माठाचे खापर यांचा आपण वापर करून घरच्या घरी ऑक्सिजन निर्मिती पूरक वातावरण तयार करू शकतो.
*तुळस ,दुर्वा ,कोरफड ,वाळा,झेंडू,गवती चहा,आघाडा,अद्रक पानफुटी,पुदिना,शतावरी,ऑर्किड,स्नेक प्लांट,पीस लिली ,गोल्डन पाथोस इत्यादी* बाल्कनीत तुळस,स्पायडर प्लॅन्ट ,फिशटेल फर्न यांची लागवड आपण कुंडीत करू शकतो.या सगळ्या वनस्पती वीस तासाहून अधिकवेळ ऑक्सिजन निर्मिती करणा-या आहेत.तुळस ,स्नेक प्लांटची कुंडी आपण बेडरूममध्ये ,हॉलमध्येही ठेऊ शकतो.
घराभोवतीच्या रिकाम्या जागेत गुळवेल ,जाई,नागिनीचे पान (खायचे पान),शतावरी यांची लागवड करू शकतो.ही सगळी वृक्षवल्ली औषधी गुणकारी आहेत.
मध्यम उंचीची उपयोगी झाडे
*कडीपत्ता ,शेवगा,प्राजक्त ,आवळा ,अडुळसा,निरगुडी,जास्वंद,लिंबू,एरंड ,नागचाफा* अशी दहा ते बारा फुटी झाडे आपण जागेच्या उपलब्धतेनुसार लावू शकतो.रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने वरील झाडे अत्यंतिक उपयोगाची आहेत.विस्तारभयास्तव प्रत्येकाचं महत्व इथं अधोरेखित करणं शक्य नाही.
विस्तीर्ण जागा ,मैदान ,शेतातील वृक्ष लागवड
पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी स्थानिक ,देशी झाडांची लागवड महत्वाची आहे.विदेशी इंडो जर्मन झाडांमुळे हिरवाई दिसते ,त्यांच्यापासून सावलीही मिळते पण अॉक्सिजन निर्मिती ,पक्षांचे घरटे,हवेची शुद्धता यासाठी ही झाडे उपयोगी नाहीत.सजीवातील जैव विविधता तयार होण्याला हजारो वर्षाचा कालखंड लागलेला असतो व त्या प्रमाणे सजीवांच्या छोट्या मोठ्या परिसंस्था, जीवनसाखळ्या तयार झालेल्या असतात.वृक्षारोपन म्हणजे लागवडीची कोटीच्या कोटी उड्डाणे नव्हे तर स्थानिक परिस्थितीतील वृक्षांचे पुनर्जीवन होय.
विस्तीर्ण मोकळ्या जागेत पर्यावरण पुरक जंगल तयार करणे आवश्यक आहे.या जंगलात खालील वृक्षांची लागवड करण्यात यावी.वड, पिंपळ,उंबर,नांद्रुक, कडुनिंब, कदंब.
*पिंपळ*.. बावीस तास ऑक्सिजन देणारा वृक्ष
*कडुलिंब,वड,बांबू,सीताअशोक,बेहडा,चिंच,आंबा,पळस* ही झाडेही वीस तासाहून अधिक वेळ ऑक्सिजन पुरवठा करत असतात.शिवाय औषधी आहेत.
ईस्त्राईल देशाने स्थानिकची जैवविविधता लक्षात घेऊनच तिथली पर्यावरणपूरकता जपली आहे.आपल्यालाही तसेच करणे आवश्यक आहे.
बोरी बाभळी या काटेरी वनस्पती आपल्या पर्यावरणाचा अनिवार्य भाग आहे.पक्षी घरटी बांधण्यास याच झाडांना पहिली पसंदी देतात.मधमाशीही आपले निवासास्थान बोरी-बाभळीवरच थाटते.परागीभवनात मधमाशीची बरोबरी कुणीच करू शकत नाही.डाळींबाची लागवड करणारांनी तर आधी बोरी बाभळीची लागवड करावी.डाळींबाच्या परागीभवनात मधमाशी व मधमाशीसाठी बोर बाभळ महत्वाची आहे.
अशा पद्धतीने आपण घर परिसरात वृक्षांची लागवड करून प्राणवायू निर्मितीस मदत करू शकतो.आपल्या भोवतालची हवा शुद्ध व स्वच्छ राखू शकतो.
*आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो ?*
संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाने पाच वर्षात पन्नास कोटी वृक्ष लागवड व जतन उद्दिष्ट लोकसहभागातून करणार आहोत.१९४२ च्या चलेजाव आंदोलनाप्रमाणे सर्व जनतेने आपल्या शक्ती,कुवत, क्षमता व बुद्धीमत्ता याला अनुसरून या आंदोलनात सहभागी व्हावे. व आपल्या परीने वृक्ष लागवड करावी,व लावलेली झाडे जपावित.जे लोक शहरात राहतात त्यांनी आपल्या दारात,घरात कुंडीत झाडे लावावीत व आपल्या भोवती जास्त ऑक्सिजन सर्वांना कसा मिळेल असे पाहावे.व या कोरोना महामारीने ग्रासलेल्या जनतेला आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्त ऑक्ससिजन देणारी झाडे लावूूून मदत करावी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रमुख सल्लागार डॉ.महेंद्र घागरे अध्यक्ष हरित मित्र परिवार चे संस्थापक अध्यक्ष हे आपणास लागणाऱ्या बियाण्यांची मदत करणार आहेत
टेरेस वरील बाग,परसबाग,पडीक शेतातील वृक्ष लागवड याबाबत मोफत मार्गदर्शन व मोफत बियाणे वाटप करण्याचे महत्वकांक्षी काम डॉ.महेंद्र घोगरे करणार आहेत.आपला परिसर पर्यावरण पूरक करण्यासाठी आपण डॉ.महेंद्र घागरे (7720888666) यांना आमंत्रित करू शकता.निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष यांनी या कामात पुढाकर घ्यावा.शाळा ,कॉलेज,पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्था यांच्या मदतीने आपण आपले उद्दिष्ट साध्य करू या.असे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे,कार्याध्यक्ष श्री.विलास महाडिक,प्रसिद्धी प्रमुख धीरज वाटेकर ,सचिव प्रमोद मोरे,कचरू चांभारे बीड जिल्हाध्यक्ष , तुकाराम अडसूळ जिल्हाध्यक्ष अ. नगर ,राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी ,सदस्य व राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्थानिक पातळीवर कडूलिंबाच्या बियांच्या उपलब्ध करून कडूलिंबाची जास्तीत लागवड करावी.हा वृक्ष कमी पाण्यावर तसेच डोंगराळ रानातही रूजतो.कडूलिंब ,पिंपळ ,वड,बाभूळ,चिंच,नांद्रुक,बेल हे वृक्ष ऑक्सिजन निर्मितीसाठी खूप महत्वाचे आहेत.रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे लावल्यास वाहनांतून निघणारा विषारी वायू,कर्ब व धुलिकण शोषून घेण्यास मदत होइल.या झाडांच्या सान्निध्यात नैराश्य दूर होते.माणसाची प्रतिकारशक्ती वाढू शकते,ताजी हवा मिळते.ग्लोबल वार्मिंग चे दुष्परिणाम कमी होतील.ही झाडे लावणे म्हणजे आपणा स्वतःस व आपल्या पुढच्या पिढीसाठी शुद्ध हवा,पाणी व आरोग्यदायी जीवन मिळण्यासाठी ऑक्सिजन बँकेची स्थापना केल्यासारखी आहे.चला तर मग वाट कसली पाहता ? .......
ऑक्सिजन देणारी देशी झाडे लावा ,आपली प्रतिकारशक्ती वाढवा व साथीच्या आजारापासून दूर राहा.तसेच ऑक्सिजन बँकेचे संस्थापक व्हा.
आपले नम्र,
वृक्षमित्र आबासाहेब मोरे
मोबाईल -+91 75886 03861
शब्दांकन कचरू चांभारे
जिल्हाध्यक्ष निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा शाखा बीड
mo.9421384434
विलास (भाई) महाडीक
कार्याध्यक्ष
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ
9423376435
थँक्स🙏
ReplyDeleteधन्यवाद सर....
ReplyDeleteखूप चांगले लेखन , विवेचन
ReplyDeleteKhupch sundar sir
ReplyDeleteThanks sir 🌳🌱🌴🌲🏞️💐💐💐
ReplyDeleteनमस्कार मंडळी, धन्यवाद छान माहिती सामायिक करण्यासाठी. एक विनंती आहे या लेख मधे नमूद केलेले कुठले वृक्ष किती काळ प्राणवायू देतात किंवा कुठले देत नाहीत या बाबत संदर्भ-साहित्य वाचता येण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
ReplyDelete