Posts

Showing posts from April, 2020

शासनाने कोकणासाठी "वणवा मुक्त गाव" पुरस्कार जाहीर करावा.

Image
    शासनाने कोकणासाठी “वणवामुक्त गाव “ पुरस्कार जाहीर करणेबाबत प्रति, मान. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन   यांसी,                            ग्रामविकासासाठी विविध अभियान व उपक्रम राबवीत असताना प्रत्येक गावामध्ये “ वणवामुक्त गाव ” यासारखे अभियान राबविणे आज काळाची गरज आहे. ‌ आज ग्लोबल वॉर्मिंगच्या भीषण संकटात वणव्यामुळे जंगले नष्ट होणे माणसाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. वणवा डोंगर व जंगल प्रदेश उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होतात. ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. किंबहुना वणवा विझविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींची जीवितहानी सुद्धा नोंदविण्यात आलेली आहे. कित्येक बागायतदार मोठय़ा मेहनतीने खूप मोठाले खर्च करून आंबा, काजू, सीताफळ, साग, बांबू, इ. लागवड करतात. त्यात त्यांना यश येऊ लागले आहे असे वाटावे, तोपर्यंत वणव्यांनी त्या बागेचा कोळसा झालेला पाहण्याची वेळ अनेकांवर आली आहे.                वृक्षच आहेत वसुंधरेचा प्

बाबा आमटे यांचे " आनंदवन "

Image
बाबा आमटे यांचे समाधीस्थळ ( कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढल्यामुळे तोंडाला बांदावयाचे मास्क , मेडीकल येथे कमी प्रमाणात उपलब्द्द होत होते. त्याच दरम्यान पेपर मध्ये बातमी वाचावयास मिळाली की बाबा आमटे यांच्या आनंदवन मधून कुष्ठरोग्यांच्या मार्फत त्यांच्या हातमागावरील त्यांनी तयार केलेल्या कापडापासून ५ लाख मास्क ते तयार करून देणार . हि बातमी वाचली ,लगेच माझ्या डोळ्यासमोर आनंदवन दिसू लागले. फेब्रुवारीत आम्ही आनंदवन,हेमलकसा,सोमनाथ येथे जावून आलो होतो. )            1 फेब्रुवारी 2020 ला आम्ही आनंदवन येथे जाण्यासाठी निघालो,आनंदवन येथे पोचल्यावर आम्हाला अगोदर बुकिंग केल्यामुळे आम्हाला रूम देण्यात आली.रूममध्ये सामान ठेवून फ्रेश होवून जेवणाची व्यवस्था ज्या हॉल मध्ये केली आहे तेथे  जेवण आटोपून आम्ही आनंदवन पाहण्यासाठी बाहेर पडलो.तेथील कार्यालयात जावून आम्ही सर्वांची नावे नोंद वहीत मोबाईल नंबर सह नोंदणी केली.त्यांनी आनंदवन पाहण्यासाठी गाईड आम्हाला दिला. गाईड सुद्धा बाबा आमटे यांच्या सहवासात वाढलेले काका देऊन ते तुम्हाला माहिती देतील असे सांगण्यात आले.ते सुद्धा कुष्ठरोगी म्हणून बाब

जीवसृष्टी वाचवा अभियान

Image
         कोरोना संकटामुळे सर्व भारतीय लोकडावून मध्ये आहेत.विषाणू मुळे महामारी सर्व जगाला सतावीत आहे.3 मे पर्यंत लोकडावून वाढविला आहे.आपल्यामध्ये विविध प्रकारचे तज्ञ मंडळी आहेत .जीवसृष्टी वाचवा अभियान मध्ये आम्ही काही विषय दिलेले आहेत.आपणास काय सुचवावयाचे आहे ते आपण पालक,विद्यार्थी, व सर्व पर्यावरण प्रेमी देशवासीय आपण विषयानुरूप प्रकल्प तयार करून आपण पाठवू शकता. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि  मुरली फौंडेशन अहमदनगर  संयुक्त विद्यमाने आयोजित *जीवसृष्टी वाचवा अभियान* संपूर्ण विश्वातील सजीव सृष्टीला वाचविण्यासाठी, पुढील पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी, आरोग्यसंपन्न जीवन मिळण्यासाठी आम्ही उपरोक्त संस्थांच्या वतीने *जीवसृष्टी वाचवा अभियान* घोषित करीत आहोत. या अभियानांतर्गत राज्यभरातील सर्व पर्यावरण प्रेमी बंधू भगिनींना, कार्यकर्त्यांना, तज्ज्ञ मार्गदर्शकांना आवाहन करीत आहोत... आपण आपल्या खाली दिलेल्या विषयातील अभ्यास, अनुभव आणि कार्यानुरूप कृतिशील प्रकल्प तयार करावा.  तो टाईप करून मेलवर आणि एक प्रत पोस्टाने हार्ड कॉपी स्वरूपात खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवाव