Posts

Showing posts from July, 2022

@निसर्गाचे करू संरक्षण,वाचवू साप आणि मानवी जीवन @

Image
 (श्रावण महिना सुरू झाला आहे.श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी फक्त आपण नागाला पूजनीय मानतो.पण इतर दिवशी तो आपला दुष्मन म्हणून सारे लोक पाहतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते, सापाविषयी डॉ. संतोष पाटील जैवविविधता अभ्यासक ,सिल्लोड-औरंगाबाद यांनी लिहिलेले लेखन आपणा पर्यावरण अभ्यासकांना व इतर लोकांना उपयुक्त ठरेल. असा विश्वास वाटतो. डॉ. पाटील यांनी लिहीलेले लेखन येथे माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.वरील सापांची छायाचित्रे सर्पमित्र अनिकेत चोपडे,पेढे-चिपळूण यांनी स्वतः click केली आहेत.)            १ ) साप हा निसर्गाच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे.घुस ,उंदिर आदी उपद्रवी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सापाची भूमिका महत्त्वाची आहे.या व्यतिरिक्त  बेडूक,सरडे ,पाली ,इतर लहान कीटक हे ही सापाचे अन्न असल्याने त्यांची संख्या मर्यादित राहते. उंदीर शेतमालाचे खूप नुकसान करतात व उंदिर संपवून साप शेतकऱ्यांना मदत करतात म्हणून त्यांना शेतकरी मित्र समजले जाते. तो जैवविविधतेचा महत्वाचा घटक आहे.सापा बद्द्ल अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत.या गैरसमजा पायी मानवी वस्तीत आल

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

Image
 (मी लहानपानापासून या मृगाच्या किड्याला पहात आलेलो आहे,शाळेच्या परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत गावातच फिरत असू,त्या वेळेस नजरेस पडायचा,त्याचा रंग पाहून कोणासही भुरळ पडेल असा हा मृग किडा.हा नाजूक ,लाजाळू किडा काय खात असेल याचा पत्ता मला आजपर्यंत लागला नव्हता. अनेक जेष्ठमाणसांना विचारले त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते. ते आज मला डॉ. संतोष पाटील ,अभिनव प्रतिष्ठान,औरंगाबाद यांच्या सोशल मीडियावर आलेली पोस्ट वाचनात आली त्यातून मला हवी असणारी उत्तरे मिळाली.आणि मला आनंद झाला .आपणा पर्यावरण प्रेमींसाठी व इतर वाचकांसाठी ही माहिती मिळावी यासाठी ब्लॉगवरून share करीत आहे.)                नेमेची येतो पावसाळा अन त्या सोबत येतात बेडकांचे ड्राव,ड्राव,पावशा पक्षाचे पेरते,पेरते व्हा... हा एका सुरात सतत येणारा आवाज, रात्री सुध्दा.  अन त्या सोबत दिसतात अनेक पावसाच्या पाऊल खुणा ...पाऊस निर्मीती ची प्रक्रिया ढगात होते...मात्र त्याची वर्दी देणारे भूतलावर अगणित वाटसरू  टपून बसलेले असतात... कधी एकदाच्या सरी कोसळतात अन आम्हीं शितकाल समाधी मधुन बाहेर येतो... जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी* ...यात एक याचक आहे...