Posts

Showing posts from May, 2020

चिपळूणातील -पेढे मोरेवाडी येथील डोंगर हिरवाईने सजणार.

Image
          श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग जि. रायगड यांच्या प्रेरणेने श्री समर्थ बैठक चिपळूण यातील पेढे-माळीवाडी,मोरेवाडी,कुंभारवाडी व चिपळूण मधील काही सदस्यांनी पेढे-मोरेवाडी डोंगरावर स्वतः वृक्ष लागवड केली आहे,स्वतः लहान मुलांप्रमाणे जोपासना करून ती झाडे वाढविली आहेत. पेढे मोरेवाडी येथील डोंगर हा तीव्र उताराचा माणसांना सुद्धा चालताना तोल जातो की काय अशा प्रकारचा.पूर्वी या ठिकाणी या वाडीतील गुरे चरण्यासाठी  हा मोकळा माळरान वापरला जायचा. आज गुरे कमी झाली,वाडीतील मुले चिपळूण बाजारात कामाला लागली  त्यामुळे गुरे चारणे व पाळणे कमी झाले. ह्या माळावर  श्री समर्थ बैठक चिपळूण परिवारातील श्री सदस्य यांनी हा उजाड माळरान हिरवे करण्याची तयारी केली.व करणारच या इर्षेने. मागील 3 वर्षांपासून मी हे स्वतः तेथे जाऊन त्या लोकांशी चर्चा करून त्यांची अपार मेहनत पहात आलो आहे. त्या लहान झाडांची लहान मुलांप्रमाणे जोपासना चालू आहे. तीव्र उतार असल्याने दरवर्षी झाडाच्या बुंध्यात घातलेली माती पावसाच्या पाण्याबरोबर खाली वाहून येते. तरीही झाडे जगविणे व त्यांचे संगोपन करणे हे श्री समर्थ बैठक