शासनाने कोकणासाठी "वणवा मुक्त गाव" पुरस्कार जाहीर करावा.


  शासनाने कोकणासाठी “वणवामुक्त गाव “ पुरस्कार जाहीर करणेबाबत

प्रति, मान. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र शासन  यांसी,
            
             ग्रामविकासासाठी विविध अभियान व उपक्रम राबवीत असताना प्रत्येक गावामध्ये वणवामुक्त गावयासारखे अभियान राबविणे आज काळाची गरज आहे.
आज ग्लोबल वॉर्मिंगच्या भीषण संकटात वणव्यामुळे जंगले नष्ट होणे माणसाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. वणवा डोंगर व जंगल प्रदेश उजाड करतो. झाडांचा बळी घेतो. नवीन रोपे व बी नष्ट करतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करतो. पाण्याचे प्रवाह कोरडे करतो. निसर्गाची व वन्यजीवांची अपरिमित हानी होते यात अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होतात. ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. किंबहुना वणवा विझविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींची जीवितहानी सुद्धा नोंदविण्यात आलेली आहे.
कित्येक बागायतदार मोठय़ा मेहनतीने खूप मोठाले खर्च करून आंबा, काजू, सीताफळ, साग, बांबू, इ. लागवड करतात. त्यात त्यांना यश येऊ लागले आहे असे वाटावे, तोपर्यंत वणव्यांनी त्या बागेचा कोळसा झालेला पाहण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
               वृक्षच आहेत वसुंधरेचा प्राण , करू त्यांचे संवर्धन राखू पर्यावरणाची शान. आज २२ एप्रिल  हा जागतिक वसुंधरा दिन आहे.आजपर्यंत आपल्याल्या आपल्या पृथ्वीने एव्हडे भरभरून दिले आहे की तिच्या उपकारांची जाणीव ठेवण्यासाठी हा दिन साजरा करतो.वसुंधरा बचाव हे अनेक वर्षे शासन ,पर्यावरण प्रेमी ओरडत आहेत.शासन पातळीवर सुद्धा अनेक प्रयत्न चालू आहेत.मानवाच्या अति हव्यासापोटी जागतिक तापमानवाढ,जलप्रदूषण,हवा प्रदूषण ,मृदा प्रदूषण ,दुष्काळ अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.त्यातच जगाला कोरोना संक्रमण ने वेढले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ‘रामराज्य ’उभे रहावे.आणि त्याचा आदर्श पूर्ण विश्वाला मिळावा या उद्देशाने मागील  शासनाने एक चांगला निर्णय घेतला.देशाच्या विकासासाठी पहिल्यांदा खेड्यांचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने पवित्र संत –संत गाडगेबाबा यांचा 'ग्राम स्वच्छता अभियान' सारखा स्तुत्य उपक्रम राबवून पात्र ग्रामपंचायतीना ‘निर्मल ग्राम' पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.त्यामुळे पायवाटा, सडका, शाळा, गल्ल्या, घरे, घरांच्या बरोबरीने वस्त्या साफसफाई, रंगरंगोटी यांनी उजळू लागल्या. याचा फायदा तो काय?....यामुळे स्वच्छतेचे महत्व सर्वांना समजले.सर्वांचे आयुर्मान व आरोग्य सुधारले. ‘निर्मल ग्राम’ अभियानाबरोबरच शासनाने महात्मा गांधी यांच्या विचारांना साकारण्यासाठी सर्व समाजाने अंगीकारण्यालाही सर्वत्र सुख, शांती, प्रेम व बंधुत्व निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष ‘रामराज्य ’निर्माण होण्यासाठी ‘तंटामुक्त गाव’ अभियान सुरु केले.यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातले ग्रामस्थ ,शाळातील शिक्षक, पोलीस पाटील, तज्ञ शिक्षित व्यक्ती, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने ‘तंटामुक्त’ अभियानाचे काम सुरु झाले. त्यामुळे कोणतेही तंटे गावोगावी शांततेने चालवून त्यातून चांगला मार्ग काढून सोडविण्यात आले.
                                     
            ग्रामविकासासाठी विविध अभियान व उपक्रम राबवीत असताना प्रत्येक गावामध्ये               वणवामुक्त गाव” यासारखे अभियान राबविणे आज काळाची गरज आहे.वणवामुक्त गाव पुरस्कार चालू करताना त्याची उद्दिष्ट व अपेक्षित फायदे यांचा सर्वांगीण विश्लेषण करणे महत्वाचे वाटते. 
         #  वणव्याची कारणे ---
प्राचीन काळापासून अगदी पुराणे, काव्य,ग्रंथ यांचा संदर्भ घेतल्यास मोठमोठ्या जंगलांना वणवे लागले असल्याचे संदर्भ मिळतात. त्यातील मानवनिर्मित व नैसर्गिक असे साठी कारणीभूत घटकांचा उल्लेख करावे लागतील.
वणव्याची नैसर्गिक कारणे ---
१ )वनांतील घर्षणे
२ )ज्वालामुखी                                                     ३ )गंधकजन्य विरहित पदार्थ                   ४)आकाशातून वीज सुक्या झाडावर किंवा गवतावर पडून वणवा लागणे.
५ ) विजेच्या तारा एकमेकांना चिकटून त्याच्या ठिणग्या गवतावर पडून वणवा लागणे.


# वणव्याची मानवनिर्मित कारणे -----
१ )हेतुपुरस्सर लावलेले वणवे.
२ )अनवधानाने लावलेले वणवे .
३ )खोडसाळपणे लावलेले वणवे .                    ४)गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज. 
५ )जंगलालगत शेती असेल तर तेथेही जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोहोचते आणि वणवा भडकतो.
६ )जंगलात फिरणारे गुराखी व तसेच पर्यटनासाठी आलेले पर्यटक व इतर लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक तसेच फेकतात. 

# वणवामुक्त गाव अभियानाची उद्दिष्टे ----
१ )जैवविविधता संरक्षण व जैवविविधता.
२ )जंगल प्राणी,प्राणी वनस्पती संरक्षण .
३ )लुप्त जाती वनसंपदेचे संरक्षण.

# वणवामुक्त गाव अभियानाचे फायदे ----
१ )लोकांमध्ये जैवविविधता व वनसंवर्धनाची जाणीव जागृती .
२ )वणव्याचे वेळेत नियंत्रण झाल्याने नैसर्गिक हानी कमी होण्यास मदत होईल.
३ )मोठमोठ्या वनांची जोपासना व संगोपन होईल.
४ )नैसर्गिक संतुलन राबविण्यास मदत होईल.

वणवामुक्त अभियानात कोणते उपक्रम राबवावेत.--------
    १)   वनसंरक्षक पातळीवरील शाळांमध्ये निसर्ग संरक्षण सेना स्थापन करावी.
२)   वनसंरक्षक पदे वनसंरक्षक मध्ये निर्माण करावीत.  
३)  लाकूड तोडण्यास प्रतिबंध घालणेस विशेष ग्रामपंचायतीना अधिकार द्यावेत.
४)  वाडीवार जनजागृती सभा, प्रबोधन फेऱ्या आयोजित कराव्यात.
५)  वनसंरक्षणाचे महत्व सर्वांना सांगण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात .
६)   वणव्यास  प्रतिबंध करण्यास विशेष आर्थिक तरतूद करावी.
७)  हेतुपुरस्सर लावलेल्या वणव्यासाठी शिक्षेची तरतूद व्हावी.

          तरी या सर्व बाबींचा विचार होऊन शासनाने वणवामुक्त गाव पुरस्कार कोकणसाठी जाहीर करावेत, जेणेकरून कोकणातील वनसंपत्ती व जैविविधता टिकून राहील.

कोकणातील आंब्याची बाग (वणव्यापूर्वी )
वणव्यामध्ये होरपळून निघालेली आंब्याची बाग .

वणव्याची विदारक दृश्ये

वणव्याची विदारक दृश्ये


विलास दत्ताराम महाडीक
          कार्याध्यक्ष
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र.
९४२२३७६४३५  

Comments

  1. परशुराम डोंगरात दरवर्षी लागणार्या/लावल्या जाणार्या वणव्यांवर कायमस्वरुपी ठोस उपाययोजना करता येईल का ? जळता डोंगर पाहतांना खूप यातना होतात.
    तुकाराम टेरवकर ९६३७६६०५९०

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म