विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग



 (मी लहानपानापासून या मृगाच्या किड्याला पहात आलेलो आहे,शाळेच्या परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत गावातच फिरत असू,त्या वेळेस नजरेस पडायचा,त्याचा रंग पाहून कोणासही भुरळ पडेल असा हा मृग किडा.हा नाजूक ,लाजाळू किडा काय खात असेल याचा पत्ता मला आजपर्यंत लागला नव्हता. अनेक जेष्ठमाणसांना विचारले त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते. ते आज मला डॉ. संतोष पाटील ,अभिनव प्रतिष्ठान,औरंगाबाद यांच्या सोशल मीडियावर आलेली पोस्ट वाचनात आली त्यातून मला हवी असणारी उत्तरे मिळाली.आणि मला आनंद झाला .आपणा पर्यावरण प्रेमींसाठी व इतर वाचकांसाठी ही माहिती मिळावी यासाठी ब्लॉगवरून share करीत आहे.)

               नेमेची येतो पावसाळा अन त्या सोबत येतात बेडकांचे ड्राव,ड्राव,पावशा पक्षाचे पेरते,पेरते व्हा... हा एका सुरात सतत येणारा आवाज, रात्री सुध्दा.  अन त्या सोबत दिसतात अनेक पावसाच्या पाऊल खुणा ...पाऊस निर्मीती ची प्रक्रिया ढगात होते...मात्र त्याची वर्दी देणारे भूतलावर अगणित वाटसरू  टपून बसलेले असतात... कधी एकदाच्या सरी कोसळतात अन आम्हीं शितकाल समाधी मधुन बाहेर येतो... जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी* ...यात एक याचक आहे... मृगाचा किडा... हू.... कोणी त्याला राणी किडा ही म्हणतं...राणी च का?..यात नर राजा पेक्षा रानी च आकाराने मोठी असते...नजरेत चटकन भरते......म्हणून तो मान...... ..आमना खान्देश मा यासले "गोसावी" म्हणस.. अगदी बरोबर..अंगावर लाल भडक ,मखमली  कपडे घातलेले साधू बुवा ..सतत भटकंती वर असतात... म्हणून कदाचीत या निसर्ग संतास गोसावी हा वंदनिय दैवी शब्द आला असावा.  
              या किड्यास इंग्रजीत रेन बग -rain bug ही म्हणतात. Trombididae  फॅमिली मधील हा ,"रेड वेलवेट माईट" अगदी निरुपद्रवी पण अति उपयोगी कीटक आहे,,किडा आहे,.याच्या त्वचेवर अगदी बारीक केसांची लव असते,ज्यास fur म्हटलं जाते त्यामुळे हे velveti touch मिळतो... हा  किडा आता मात्र सहसा दिसत नाही..... दुर्मिळ होत चालला आहे...काजव्या सारखा.... कस्तुरी मृगा सारखा....पावसाळ्याच्या सुरुवातीला जी  जैवविविधता उमलते त्यात ही "भगवी शाल" मान बिंदु.... मृगाची चाहूल देऊन ....जून च्या अंता पर्यंत हे महोदय शेतात मनसोक्तपणे वावरताना आपण बघतो...जवळ गेले स्पर्श केला की पाय लगेच पोटाकडे  ओढुन निरागस अन मासुम बनत हे आपले अस्तित्व आपल्या कडे जणू उधार मागतात,आपण हात लावला की जणू ते शरण जातात... विपरित परिस्थितीत माणसाने कसे वागावे हे माणसाला हा छोटासा जीव शिकवतो.. मनुष्य हा ही दयाक्षील प्राणी आहे...होता,,,,,सोडून दिले की लगेच नाही पळणार हे...wait n watch ...,.थोड्या वेळाने पळणार हे....यांची निसर्गातील भूमिका विषद करणे हा आजचा शब्द अन वेळ खर्च करण्यामागे हेतू.. या मखमली राणी किड्याची शेती मध्ये  उपयुक्त भूमिका आहे.. लहान ,सहान कीटक,वाळवी, वाळवी ची अंडी, खावून ,,कपाशी वरिल पिठ्या ढेकूण ची अंडी व बाल्यावस्था,अल्फा अल्फा व तत्सम ह शेतीचे नुकसान करणारे कीटक नष्ट करून जैविक कीड नियंत्रण ही भूमिका हा हिरव्या रंग मंचावर हा  साकारत असतो.नागतोडे ची अंडी, पिकांची नासधूस करणाऱ्या अळ्या जेव्हा नुकत्याच कोषा तुन..larvaa phase मधुन बाहेर येतात तेव्हा त्या फस्त करून हे महोदय गुजराण करतात.. या त्रास दायक किटकांची अंडी यांची fevourite reciepy रेसिपी...1 दीड सें मी लांबी चा हा जीव आभाळा एव्हढा महत्वाचा..नातं ही आभाळासी ,पावसाशी.यांची पूर्ण वाढ झालेली अवस्था धर्तीवर वर फार कमी काळ असते... अगदी जेमतेम महिना च हो.....याचे जीवन चक्र मोठं विचित्र ..आपण जो बघतो तो नर किंवा मादी ही पूर्ण वाढ झालेली असते..adult phase.. तेव्हा ती वावरताना दिसतात.. मग नर व मादी याचें नृत्य होते....साहजिकच आकर्षण हा केंद्र बिंदू....निसर्ग प्रजोत्पादनावर टिकून आहे...निसर्गाची नाव सृजनाच्या सागरात विहार करत असते...... कोणाला तरी भारून आलेला नर आपले शुक्राणू जमिनीवर किंवा गवताच्या पात्यावर किंवा छोट्या,, छोट्या पानावर टाकतो... पाला पाचोळा यातही... पण तिथे रेतन करतांना तो एक धागा निर्माण करतो.... ज्यास मी माग म्हणतो...त्या मागावरून राणी कीटक माग काढत जाते व त्या शुक्राणू वर बसून फलनाची पुढची प्रक्रिया सुरू होते..प्रत्येक प्रजाती मध्ये अंडी घालण्याची क्षमता वेगवेगळ्या असतात., जगात या राणी किड्याच्या 300 प्रजाती आहेत व आपल्या कडील ही प्रजाती 60 ते 100 अंडी एका वेळेस घालते. 2 महिन्यात ती अंडी उबतात.....तेव्हा भाद्रपद संपायला आलेला असतो...थोडे भाद्रपदातले चटका लागणारे उन्ह तेव्हा असते.याच उबेत हे घडते..ही या किटकांची दुसरी अवस्था ,..हा कीटक नंतर षटपदी म्हणजे 6 पायांचा असतो... मात्र पूर्ण वाढ झालेला हा वन्यजीव 8 पायांचा म्हणजे अष्टपाद बनतो,.. दुसऱ्या कीटकांच्या पाठीवर ढेकूणा सारखे हे चिपकून बसून व आपली सोंड -sucker त्याचा पाठीत खुपसून ते त्यांचे रक्त ज्यास hemolymph म्हणतात ते शोषतात...ज्यांचे हे शोषन करतात ते सर्व शेती साठि नुकसान ठरणारे कीटक,नागतोडे,, केसाळ  अळ्या, लष्करी अळ्या असतात व यास नुकसान करणाऱ्या त्रासदायक किड्यांचा शरीर पोखरले गेल्याने अंत होतो.....मृगाचा किडा जमिनीचा गुणवत्ता ही सुधारतो...हा जमिनीत एक स्त्राव सोडतो त्यामुळे मातीला बुरशी लागत नाही...आणी जमिनीत असलेले " बेनेफिसियल मायक्रो ऑर्गनिसम" ,ज्यास सॉईल फ्लोरा " म्हटलं जात ज्यातरायझोबियम,मायकोरायझाक,ऍक्टिनोमायकोसाइट, आदि उपयुक्त जीवाणू जपले जातात,जमिनीत "ह्युमीक आम्ल" वाढीस लागते व पिकच नव्हे तर सर्व झाडे,गवत,आदींच्या वाढीस मदत होते. सोबत पाला पाचोळा कुजण्याची प्रक्रियाला हातभार लावून खत बनवून सुपीकता वाढवतो..these are indicater of healthy soil, healthy. Eco system,,सुदृढ जमिनीचे हे सूचक आहेत.........अंडी घातली उबली की मग larva अवस्था व इतर अजून 3 अवस्था यांच्या असतात...नंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला ते शीत काल समाधि घेतात व डायरेक्ट मृगाचा पाऊस झाला की दर्शन देतात.... तेव्हा गावो गावच्या दिंड्या पंढरी च्या दिशेने निघालेल्या असतात इकडे ही "हरीत वारी". रानोमाळ सुरू होते...झाले संपलं.......... नाहीं.पूर्वी सहज नसरेस पडणारे हे महोदय आता का बरं दिसना हा खरा प्रश्न.. तण नाशके, बेसुमार कीटक नाशके यामुळे यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होत आहे.. यांची अंडी च आता उबवत नाहीं.. ज्यावर या जगतात ती कीटकांची अन्न साखळी कीटक नाशके विस्कळीत करत आहेत आणी या 30 वर्षांत ते वेगाने झालं आहे..शेतकरी मे महिन्यात बांध जाळतात, शेतातील गवत पाचोळा जाळतात ते चूक आहे. अनेक जीव नष्ट होतात,स्वार्थ, गैरसमज मोहफूल आदि साठी वणवा लावला जातो वन,डोंगर, जंगलास ,यात पोळून जाते खूप मोठी वन व जैवविविधता..यातून हे मखमली जीवन ही संपते.. बुद्धिमान मानवाने याची ही तस्करी केली. पॅरालायसीस-लखवा ,लैंगिक उत्तेजनार्थ व इतर अनेक उपयोगार्थ याचा गैरवापर विशेषतः उत्तर भारतात  आजही होत आहे.झारखंड मध्ये आदिवासी बांधव  याचा उपयोग व व्यापार ही करतात हे ही अलिकडे वाचनात आले,. तिकडे या किटकास "बहूभूती ,बिर बहूती " म्हणतात.. सुंदर दिसतो म्हणून तिकडे घरात शोभे साठि ठेवतात... मात्र जी नवं निर्मिती व्हायला हवी ती माणसाच्या मुर्ख पणाने होत नाही.. इतर मोठे साप, सरडे,पक्षी यास खात नाही कारण याची अत्यंत कडवट  चव त्यांना मानवत नाही... थोडक्यात यांना नैसर्गिक शत्रू तसा नाहीच.....माणूस सोडला तर...तो तर निसर्गाच्या जीवावर उठलाय,...👤....माणसा ...,माणसा... कधी होशील माणूस....... वाट बघतोय.....निसर्ग जपण्यासाठी ---माणूस म्हणून संगतीला येणार असाल तर स्वागतास आम्ही आहोत की---

 *आपला निसर्ग स्नेही* -  *डॉ.संतोष पाटिल, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड, जि. औरंगाबाद*,मो-9960464008


                                           संकलन - विलास (भाई) महाडीक
                                                 पेढे,चिपळूण 9422376435

Comments

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी निवड जाहीर