बाबा आमटे यांचे " आनंदवन "

बाबा आमटे यांचे समाधीस्थळ

(कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढल्यामुळे तोंडाला बांदावयाचे मास्क , मेडीकल येथे कमी प्रमाणात उपलब्द्द होत होते. त्याच दरम्यान पेपर मध्ये बातमी वाचावयास मिळाली की बाबा आमटे यांच्या आनंदवन मधून कुष्ठरोग्यांच्या मार्फत त्यांच्या हातमागावरील त्यांनी तयार केलेल्या कापडापासून ५ लाख मास्क ते तयार करून देणार . हि बातमी वाचली ,लगेच माझ्या डोळ्यासमोर आनंदवन दिसू लागले. फेब्रुवारीत आम्ही आनंदवन,हेमलकसा,सोमनाथ येथे जावून आलो होतो.)
           1 फेब्रुवारी 2020 ला आम्ही आनंदवन येथे जाण्यासाठी निघालो,आनंदवन येथे पोचल्यावर आम्हाला अगोदर बुकिंग केल्यामुळे आम्हाला रूम देण्यात आली.रूममध्ये सामान ठेवून फ्रेश होवून जेवणाची व्यवस्था ज्या हॉल मध्ये केली आहे तेथे  जेवण आटोपून आम्ही आनंदवन पाहण्यासाठी बाहेर पडलो.तेथील कार्यालयात जावून आम्ही सर्वांची नावे नोंद वहीत मोबाईल नंबर सह नोंदणी केली.त्यांनी आनंदवन पाहण्यासाठी गाईड आम्हाला दिला. गाईड सुद्धा बाबा आमटे यांच्या सहवासात वाढलेले काका देऊन ते तुम्हाला माहिती देतील असे सांगण्यात आले.ते सुद्धा कुष्ठरोगी म्हणून बाबा आमटे यांच्या काळात त्यावेळी तेथे दाखल झाले होते.त्यांना चालता येत नव्हते, ते बॅटरीवर चालणाऱ्या सायकलीवर बसून चाला माझ्याबरोबर असा इशारा देऊन बाहेर पडलो.ते काका नॉनस्टॉप बाहेरील आवाराची त्यांनी माहिती देण्यास सुरुवात केली .त्यांच्या बोलण्यात बाबा आमटे यांनी आम्हां कुष्ठरोग झालेल्या माणसांना स्वाभिमानाने जगण्याची उमेद दिली.त्यांच्यामुळेच येथील सर्व लोक आम्ही अभिमानाने जगत आहोत. त्यांनी आम्हाला प्रत्येक विभागात नेऊन तेथे चाललेले काम व काम करत असलेले कुष्ठरोगी आम्ही पाहिले.जांच्या जो अवयव चांगला आहे त्यांचा उपयोग करून त्यांचेकडून काम करून घेतले जात होते.त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची अजिबात चिंता नव्हती. उभारलेल्या सर्व विभागांची माहिती त्या त्या विभागात जाऊन दिली.प्रथम संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा (व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन केंद्र )दाखवून माहिती दिली. पुढे त्यांची वसाहत दाखवली. पुढे हस्तकला विभागात नेऊन तेथील कार्डस विभाग पाहिला,कागदापासून विविध प्रकारचे कोलाज काम अखंड पणे चालू होते .पुढे हस्तकला विभाग -तनिस व केळीच्या साली पासून तयार केलेली कलाकृती पाहिल्या . त्या कलाकृती पाहून आम्ही सर्वानी तोंडात बोटेच घातली,कारण असंख्य कलाकृती एकाच ठिकाणी पहावयास मिळाल्या. पुढे आनंदवन फ़ेब्रिकेशन पहावयास मिळाले. त्यापुढे फुटलेल्या पिण्याच्या सिंटेक्स टाकीचे छत आमचे लक्ष वेधून घेत होते.एका वाळलेल्या लाकडाच्या खांबावर त्याचा छत्रीसारखा वापर केला होता. पुढील विभाग काष्ठ शिल्प विभाग लाकूड बांबू पासून केलेल्या कलाकृती पहावयास मिळाल्या. काष्ठ शिल्प  बनविणारे मदन जोडपे यांनी लाकडापासून हजारो कलाकृती  कशा बनविल्या असतील झाले हे आठवून मन सुन्न झालं.  पुुढे प्रवेेेशीत मुलांचे वसतिगृह  पहावयास मिळाले. हे सर्व  पहाताना . आपण काय करतो..... कारण काही अपंग होते, त्या मध्ये मुकबधीर मुली स्वेटर विणत होत्या.दुसऱ्या विभागात हँडलूम चालवीत होत्या. गाडया रेपरिंग हे सुद्धा काम येथील लोक करत आहेत ,स्टील कपाटे बनविणे,चाळण्या ,गाळण्या , हस्त कला ,कोलाज बनविणाऱ्या मुली महिला केळीच्या सुकलेल्या सोपापासून हस्त कला ,लेदरच्या बॅग बनविणारे  हे सर्व लोक पाहिले दोन्ही हात नसलेली शकुंतला ही मुलगी पायात सुई घेऊन धाग्याने ग्रीटिंग बनवत होती.समोर अनेक ग्रीटिंग बनविलेली होती. पुढे कुष्ठरोगी यांचा ऑर्केस्ट्रा पाहण्याची संधी मिळाली.तेथे ज्यांना ऐकता येत नाही,दिसत नाही अशा लोकांनी बसविलेला ऑर्केस्ट्रा पाहिला .आपण जे तिकीट देऊन कंपनीवाले ऑर्केस्ट्रा बसवितात त्या तोडीचा ऑर्केस्ट्रा पहावयास मिळाला.अशक्य हा शब्दच त्यांच्याकडे नाही .आपणास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी  आनंदवन ने श्यक्य करून  दाखविल्या.असणाऱ्या अवयवाचा वापर कसा करायचा हेच बाबा यांनी सर्वाना शिकविले. हाच संदेश दिला असावा असे वाटते. मुलींचे वसतिगृह साईबाबा संस्थान चे हॉस्पिटल त्यातील माणसांची रोज  सकाळी  होणारे ड्रेसिंग पाहिले तेथील स्वच्छता  हे सर्व पहाताना पृथ्वीवर बाबा आमटे यांनी स्वर्ग अवतरवला आहे याचा अनुभव आम्ही सर्वजण घेत होतो.डॉक्टर विकास आमटे यांची वेळ घेऊन त्यांनी संध्याकाळी 6.30 ची वेळ दिली त्यांच्याकडून  बाबा आमटे यांचे कार्य समजुुन घेतले त्यांनी त्यांचे चरित्र उलगडून सांगितले 9.15 पर्यंत आम्ही मंत्रमुग्ध हे सर्व होऊन ऐकत होतो. सकाळी प्रथम बाबांंच्या समाधी स्थळाला भेट देेेऊन आनंदवन चा निरोप घेतला. हेमलकसा येथे संध्याकाळी पोहचलो.सकाळी उठल्यावर सर्व आटोपून डॉक्टर मान. प्रकाश आमटे यांच्यावर काढलेली फिल्म पाहून बाहेरील परिसर पहाण्यास बाहेर पडलो.
       बाबांचे पूर्वीचे सहकारी मनोहर काका यांनी येथे आपली ४५ वर्षे येथे सेवा कशी  झाली याची माहिती दिली.तेथील प्राणी संग्राहलय त्यांची देखरेख,सर्व प्राणी मात्रांना त्यांचाबद्दल ची आपुलकी,प्रेमभावना पहावयास मिळाली. पुढे आदिवासींना काढून दिलेल्या शाळा,त्यांची वसतिगृह ,मुलांना कॉम्पुटरशिक्षणासाठी तयार केलीली भली मोठी रूम व त्यामध्ये असणारे कॉम्पुटर व ते हाताळताना तेथील आदिवासी मुले पाहिली. त्यांनी काढलेल्या आदिवासी मुलांसाठी काढलेल्या शाळा पाहिल्या,ती सर्व मुले तेथील वसतिगृहामध्ये राहतात ते दोनमजली वसतिगृह पाहिले.आदिवासी लोकांसाठी चालविण्यात येणारे सुसज्ज असे हॉस्पिटल दाखविण्यात आले .
                 आदिवासीमधील माडिया जमातीतील रूढी परंपरा आम्ही समजून घेतल्या. या जमातीतील लोकांच्या सभा, बैठका,जनमत,भांडण-तंटे एकोप्याने बसून सोडविण्याचे ठिकाण म्हणजे गोटूल.( आपल्याकडे सहाण किंवा चव्हाटा ) त्यांचा परंपरेनुसार लग्न झाल्यानंतर आपली मुलगी दुसर्याच्या घरी जाणार तेव्हा तिला नांदवतील की नाही या भीतीपोटी घरच्यांकडून मुलाकरवी अखंड लाकडामध्ये त्यातील गोटुल व कारागिरी केलेले मानाचे लाकूड त्या कडून करवून घेतले जायचे. हे ज्याला जमले त्यालाच मुलगी दिली जायची.हि नवर्या मुलाची कसोटी.
   पुढे आम्ही भामरागड येथे गाडी ठेवून पर्लकोटा ,पामुल गौतम ,इंद्रावती या नद्यांच्या संगमावर गेलो.महाराष्ट्र व छत्तीसगड बोर्डर वर ह्या नद्या एकत्र मिळून तेलंगणा राज्याकडे वाहात जातात. या भेटीत आम्हाला हत्तीशी बोलणार्या माणसाशी भेट घडवून दिली ती चिपळूण च्या जंगले भ्रमंती करणाऱ्या निलेश बापट याच्यामुळे. त्या  व्यक्तीचे नाव आनंद शिंदे जंगलातील हत्तींना किंवा माहुतांच्या हाताबाहेर गेलेल्या / पिसाळलेल्या हत्तींना काबूत कसे आणतात ही सर्व माहिती आम्हाला प्रत्यक्ष त्यांचाकडून ऐकण्यास मिळाली.ह्या व्यक्तीने हत्तींच्या हालचाली, त्यांचे ओरडणे,यांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. मला नेहमी प्रश्न पडायचा की जंगलाला हत्तींचा काय उपयोग होत असेल. तर त्यांचा बोलण्यातून मला लक्षात आलेली गोष्ट म्हणजे त्यांचा प्रत्येक हालचाली जंगलातील इतर प्राण्यांना उपकारक असतात. उदा. त्यांचा पायांनी पडणार्या खड्ड्यांनी इतर छोटे जीव जंतू त्यामध्ये राहून आपली पैदास करतात.त्या पायाच्या खड्यात साचलेल्या पाण्यात इतर छोटे पक्षी  प्राणी पाणी पितात.ते मोठ्या प्रवाहात जावू शकत नाहीत.त्यामुळे जंगलाला सर्व छोट्या मोठ्या प्राण्यांचा हा उपयोग  असतोच.आमचा मित्र जंगलप्रेमी निलेश बापट नेहमी सांगत असतोच की जंगल पेपर मधल्या हेडिंग प्रमाणे वाचायचे नसते .ते पूर्ण समजून घ्यायचे असते.


बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार सन्मान पाहिले ते आपणास माहिती साठी देत आहे.
*समाजसुधारक*
मुरलीधर देवीदास आमटे*
*जन्म : २६ डिसेंबर १९१४*
(हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र)
*मृत्यू : ९ फेब्रुवारी  २००८*
(आनंदवन,वरोरा, चंद्रपूर, महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपणनावे : बाबा आमटे
नागरिकत्व : भारतीय
शिक्षण : बी.ए.एल.एल.बी.
प्रसिद्ध कामे : आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प
ख्याती : कुष्ठरुग्णांची सेवा
धर्म : हिंदू
जोडीदार : साधना आमटे
अपत्ये : प्रकाश आमटे, विकास आमटे
वडील : देवीदास
पुरस्कार : डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार,
रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
पद्मश्री,
पद्मविभूषण,
महाराष्ट्रभूषण
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.

💁🏻‍♂ *जीवन*

मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना  गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

*अभय साधक*

१९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.

⚛ *आनंदवन*

समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’!

आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरु केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रुपांतरीत झाला आहे. प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते. आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद, केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्य.
आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे. कायद्याचे पदवीधर मुरलीधर देविदास आमटे. सुखवस्तू कुटुंबातील. त्यांचे मन न्यायालयात फारसे रमले नाही. नियतीने त्यांची वाट वेगळीच ठरविली होती. समाजाने आणि परिवाराने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरुग्णांवर त्यांची दृष्टी पडली. त्यांना जीवनाचे ध्येय सापडले. जगण्याचा मार्ग मिळाला. सुखकर आयुष्य सोडून ते १९४९ मध्ये वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. १९५१ मध्ये काही कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली.
त्या वेळी त्यांच्या पाठीशी पत्नी साधनाताई उभ्या होत्या. साधनाताईही सुखवस्तू कुटुंबातील; परंतु त्यांनी समाजाची चिंता वाहणारा, त्यांची आसवे टिपणारा फकीर, जोडीदार म्हणून निवडला. प्रारंभीच्या दिवसांत आनंदवन म्हणजे साप, विंचू यांचे घर होते. सर्वत्र दलदल. सोबत काळोख. अशा ठिकाणी बाबा आणि साधनाताई वास्तव्याला आले. अनेक कठीण प्रसंग आलेत; मात्र बाबा आणि ताई ध्येयापासून दूर गेले नाहीत. अशा वेळी त्यांच्यासमोर रक्ताच्या नात्यांनी, समाजाने बहिष्कृत केलेली माणसे दिसायची. त्यांच्या डोळ्यांतील आसवे दिसायची. त्यांच्या दु:खात स्वत:ला सामावून घेताना बाबा आणि ताईंना सुख मिळायचे. कालांतराने हजारो माणसे जुळत गेली. आनंदवन श्रमवन म्हणून विकसित झाले. मात्र, आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य एवढीच ओळख जनमानसात आहे. प्रत्यक्षात अंध-अपंग, करप्र
प्रत्यक्षात अंध-अपंग, कर्णबधिर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे मॉडेल आनंदवन आहे.

♻ *आनंदवन समाजभान अभियान*

‘समाजभान अभियान’! या अभियानांतर्गत पाच कलमी कार्यक्रम आहोत.
१. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ताज्या दमाचे जे अनेक कार्यकर्ते सामाजिक कामांमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्या पाठीशी आनंदवनाने मोठय़ा भावाच्या भूमिकेतून उभं राहावं व त्यांना समाजाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
२. आनंदवनाने आजवरच्या प्रवासात शेती, पाणी, घरबांधणी, सामाजिक वनीकरण, दुग्धविकास, प्लास्टिक पुनर्वापर अशा विविध क्षेत्रांत नानाविध यशस्वी प्रयोग केले आहेत.
३. महाराष्ट्रातल्या गावा-शहरांमध्ये जाऊन तेथील महाविद्यालयीन तरुण, स्थानिक मंडळी आणि उत्साही कार्यकर्ते यांच्यासाठी सामाजिक जाणीव-जागृतीच्या अनुषंगाने जाहीर भाषणं, परिसंवाद, मुलाखती यांचं आयोजन करण्याचा आमचा मनोदय आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना आनंदवनात आमंत्रित करून तेथील प्रयोगांबद्दल अवगत केलं जाईल.
४. महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांत नवनव्या कल्पनांचं सर्जन करणाऱ्या ‘पब्लिक इनोव्हेटर्स’ना हुडकून त्यांचं काम सरकार, उद्योग व अन्य व्यासपीठांपर्यंत पोहोचवणे.
५. तरुण पिढीशी संवाद साधणं आणि त्यांना सामाजिक भान देणं याची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने सामाजिक भान देणाऱ्या मराठीतील महत्त्वाच्या पुस्तकांची यादी तयार करून ती सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवणे. 

⚜ *लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा*
लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूर द्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविल्या जाते. २३ डिसेंबर १९७३ रोजी सामाजिक कार्यकर्ते मा. बाबा आमटे यांनी माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु केले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून १६० कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून ६० कि.मी. दूरवर आहे.
डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत. त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी २००८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आले.


इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापन केल्या.

आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)
सोमनाथ प्रकल्प - मूल (चंद्रपूर)
अशोकवन - नागपूर
लोकबिरादरी प्रकल्प - हेमलकसा
बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे त्यांचे कार्य  पुढे नेत आहेत.

*साहित्य*
*बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत*
'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्रह
'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
'माती जागवील त्याला मत'
बाबा आमटे यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके 
आनंदवन प्रयोगवन लेखक डॉ. विकास आमटे 
मला (न) कळलेले बाबा आमटे (लेखक : विलास मनोहर)
बाबा आमटे (चरित्र, मूळ लेखिका तारा धर्माधिकारी; हिंदी अनुवाद डॉ. हेमा जावडेकर)
बाबा आमटे (चरित्र, लेखक भ.ग. बापट)
बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद (बाळू दुगडूमवार). या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे (२०१७)
बाबा आमटे यांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी 'वादळ माणसाळतंय' नावाचे नाटक लिहिले आहे.
🏆 *पुरस्कार*
       🏅 *आंतरराष्ट्रीय* 🎖
सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९९९
रॅमन मॅगसेसे पुरस्कार
डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - इ.स. १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्.
संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार, इ.स. १९९८
आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका इ.स. १९८९
टेंपल्टन बहुमान, अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी), इ.स. १९९०
पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर, इ.स. १९९१
पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार, इ.स. १९९१
पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार (४ डिसेंबर २००४)
राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, स्वीडन - इ.स. १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे )
गूगल ने २६ डिसेंबर २०१८ रोजी बाबा आमटे (त्यांच्या जयंतीच्या दिवशी) यांच्यावरचे डूडल दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
      🎖 *भारतीय* 🏅
पद्मश्री इ.स. १९७१
पद्मविभूषण इ.स. १९८६
अपंग कल्याण पुरस्कार इ.स. १९८६





केळीच्या सालीपासून बनविलेले ग्रीटिंग्ज







विलास (भाई) महाडीक
कार्याध्यक्ष
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र. मोबा.९४२२३७६४३५



Comments

  1. आम्हीदेखील १२/०२/२०२० पासून आनंदवन ,हेमलकसा , सोमनाथ दौर्यावर होतो. आमटे यांचे ते भव्य दिव्य महान कार्य पाहून नतमस्तक झालो.
    सौ.रुपाली तुकाराम टेरवकर.९६३७६६०५९०/९४२०९०८५५१

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म