@ निसर्गातील रंगपंचमी.@
वसंताच्या आगमनाचे जंगलात जणू रंगपंचमी साजरी होत आहे. झाडांची नविन पालवी,फुले सुद्धा विविध प्रकारच्या रंगात येत असतात.जंगलात फिरताना वेगवेगळ्या झाडांची वेगवेगळी फुले त्यांचे वेगवेगळे सुंदर सुवास आपले लक्ष वेधून घेतात.जंगलचा वणवा म्हणजे "फ्लेम ऑफ फॉरेस्ट " अर्थात पळस आता बहरू लागला.डॉ. संतोष पाटील सिल्लोड यांनी अजंठा जंगलात पिवळा पळस यांचे फोटो पाठविले आहेत.पूर्वीं फुलांपासून बनविले गेलेल्या रंगांनी अजंठा लेणीतील रंगकाम केलेलं आजही टिकून आहे.कोकणात पिवळा पळस नजरेस पडत नाहीत. पळसाला पक्षांचा ज्यूस बार ज्यास म्हटले जाते. काटेसावर ही गर्द गुलाबी छटा व फेंट गुलाबी व कोकणात काही ठिकाणी पिवळी काटेसावर नजरेस पडते. वनात ही झाडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत व आपले रंग उधळत आहे. पांगारा आपल्या आकर्षक रंगांनी व मकरंद यांनी भरलेली फुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.वर्षभरात नजरेस न पडणारे पक्षी थव्याने व त्यांच्या किलबिलाटाने या फुललेल्या झाडावर हमखास दिसून येतात. बुलबुल,फुलटोच्या ,शिंजिर,मैना,खार,पोपट या सारखे पक्षी ,फुलपाखरे,वटवाघुळे ,मधमाशा काटे सावरच्या फुलांचा पराग चाखतात.अगदी मुंग्या ही खाली पडलेल्या फुलांवर तुटुन पडतात.उन्हाळ्यात ही फुले म्हणजे त्यांना रसवंतीच. म्हणून यास पक्षांचा 'ज्युसबार ' म्हणतात.
@ फुलांचे महत्व --
1)-काटेसावर-याच्या फुलांचा मकरंद फुलपाखरे,पक्षी ,वटवाघळे,माकडे, आदी वन्यजीवांना अन्न तर उष्णतेच्या विकारावर मानवास उपयोग,तसेच सांधेदुखी मध्ये फुलांच्या पाकळ्या चावून खाल्याने सांधेदुखीमधे आराम मिळतो.तसेच ही फुले वाळवून त्याची पावडर करून इतर हंगामात ही वापर करता येतो.
2) पळस-पोटाच्या,मुतखडा विकारात, ही फुले उपयुक्त.ज्या वेळी ही फुले बहरतात त्यावेळी गोळा करून वाळवून ठेवावीत ज्या वेळी उपयोग करावयाचा असेल तेव्हा झोपताना २ फुले पाण्याने भरलेल्या फुलपात्रामध्ये २ फुले रात्रभर ठेवावीत व सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे. अनेक पक्षी त्यामध्ये पोपट,मैना,बुलबुल,चिमण्या असे अनेक प्रकारचे पक्षी सकाळच्या वेळी यावर ताव मारतात.पळस फुलांमध्ये काही डास अंडी घालतात मात्र ती उबवत नाही परिणामी डासांच्या संख्येवर नैसर्गिक नियंत्रण.आयुर्वेदात ही फुले महत्त्वाची मानली जातात.
3 ) पांगारा-पक्षी ,फुलपाखरे ,मधमाश्यांना प्रिय.
4 )करवंद-फुलपाखरे ,कीटक याकडे आकर्षीत होतात
@ विलास महाडीक @





Comments
Post a Comment