@निसर्गाचे करू संरक्षण,वाचवू साप आणि मानवी जीवन @










 (श्रावण महिना सुरू झाला आहे.श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी फक्त आपण नागाला पूजनीय मानतो.पण इतर दिवशी तो आपला दुष्मन म्हणून सारे लोक पाहतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते, सापाविषयी डॉ. संतोष पाटील जैवविविधता अभ्यासक ,सिल्लोड-औरंगाबाद यांनी लिहिलेले लेखन आपणा पर्यावरण अभ्यासकांना व इतर लोकांना उपयुक्त ठरेल. असा विश्वास वाटतो. डॉ. पाटील यांनी लिहीलेले लेखन येथे माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.वरील सापांची छायाचित्रे सर्पमित्र अनिकेत चोपडे,पेढे-चिपळूण यांनी स्वतः click केली आहेत.)

           १ ) साप हा निसर्गाच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे.घुस ,उंदिर आदी उपद्रवी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सापाची भूमिका महत्त्वाची आहे.या व्यतिरिक्त  बेडूक,सरडे ,पाली ,इतर लहान कीटक हे ही सापाचे अन्न असल्याने त्यांची संख्या मर्यादित राहते. उंदीर शेतमालाचे खूप नुकसान करतात व उंदिर संपवून साप शेतकऱ्यांना मदत करतात म्हणून त्यांना शेतकरी मित्र समजले जाते. तो जैवविविधतेचा महत्वाचा घटक आहे.सापा बद्द्ल अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत.या गैरसमजा पायी मानवी वस्तीत आलेल्या सापांची सर्रास हत्या होते तर अंधश्रद्धा ,जादू टोना यामुळे सर्प दंश ग्रस्त व्यक्तींना जर लवकर व योग्य उपचार मिळाला नाही तर प्राणास मुकावे लागण्याच्या अनेक घटना घडतात.नाग बदला घेतो तसेच नागाच्या डोक्यावर नाग मनी असतो यामुळे नाग मारले जातात. सापाच्या विषाची  जास्तीच्या रकमेसाठी तस्करी होते.सापाची कात आणी कातडी ही शोभिवंत वस्तू बनवण्यासाठी  चढ्या दराने विकली जाते.हा खुप मोठा बेकायदेशीर व्यापार सापांच्या जीवावर उठला आहे.धामण हा अतिशय महत्त्वाचा साप आहे.धामण च्या लांबलचक व भीती दायक आकारा मूळे हा साप घातक असे मानले जाते व तिची नाग समजून हत्या केली जाते.                        
                 साप एखाद्या ठिकाणी अधिवास करतो म्हणजे एकतर त्याला तिथे अन्न उपलब्ध होत असते व दुसरे म्हणजे वातावरनानुसार अनुकूल तापमान ,जर उन्हाळा असेल तर जिथे गारवा उपलब्ध होईल तिथे व पावसाळ्यात ,हिवाळ्यात उबदार पणा तो शोधतो,निर्जन ठिकाणी ,जिथे त्यास सुरक्षितता जाणवते अशा  जागा, पाला पाचोळा,दगड,विटा, झाड, अडचणीच्या जागा आदी ठिकाणी ते अधिवासास प्राधान्य देतात.      
           २)मानवी वस्तीत सापांचा वावर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी.---
                 १)घर व घराच्या आसपास चा परिसर स्वच्छ ठेवावा,अडगळीचा सामान घरा जवळपास जरी असला तरी साप तिथे लपून बसतात व तिथे अन्न मिळत नाही व त्या शोधात ते पाली,बेडूक ,उंदीर यांना शोधण्यासाठी घर ,ओटा,जीना व गच्चीवर ही सहज जातात. विटा,दगडांचा खच,लाकडे,उंच वाढलेले गवत,याठिकाणी त्यांचा वावर नेहमीच असतो म्हणजे घरात व आजुबाजुला अडगळीचा सामान पडलेला नको.                             
                2) घरातील उरलेले खाद्य पदार्थ ,अन्न, फळं आदी गोष्टी सर्रास घरा जवळच्या मोकळ्या जागेत टाकण्यात येतात.शहरात तर हे प्रत्येक कुटुंब नेहमी करत असते. उघड्यावर टाकलेल्या या खाद्य वस्तूं मूळे तिथेउंदिर ,घुस,आदी प्राणी तिथे जमतात ,हे जीव घरात येतात ,त्यांच्या मागोमाग साप पण परिसरात व घरात येतात. बेडूक ,पाली, सरडे यांचे प्रमाण पावसाळ्यात लक्षणीय वाढते .घराच्या जवळ असलेल्या झाडा, झुडुपांवर ते अधिवास करतात व त्यांना शोधत साप तिथे येतात.उरलेले अन्न नेहमी स्थानिक प्रशासन कचरा  संकलीत करत असलेल्या घंटा गाडीतच द्यावे व जिथे ही सुविधा नसेल तिथे ओला कचरा  गावापासून लांब जमिनीत पुरून टाकावा ज्यामुळे त्याचे खत बनेल.    3) घराला लागून झाडाच्या फांद्या ,वेली असू नये.त्यांना धरून साप खिडकीतुन सहज आता येतात  व गच्चीवर ही येतात.                         4)घरातील सांडपाणी बाहेर जाते त्या पाईपला बाहेरून व आतून बारीक जाळी बसवलेली असावी.               
  5)संध्याकाळी व पहाटे अंधार असतो त्यावेळी घराचे दरवाजे, खिडकी बंद असाव्यात .ही योग्य वेळ असते साप घरात येण्याची. घराच्या प्रांगणात किंवा मोठया कुंडीत औषधी दृष्टया उपयोगी असलेली व जीचा वास सापांना सहन होत नाही व दूर राहण्यास मदत होते अशी सर्पगंधा व वेखंड ची रोपे जरूर लावावी.वेखंड च्या काड्या एका जाळीदार कापडात ठेवून ज्याचा वास येईल अशा पद्धतीने घरात व ओट्यावर ठेवा ,त्याचा वास ही सापांना दूर ठेवतो.    
            
     *सर्प दंश होऊ नये म्हणून*-------------
              1)पावसाळ्यात जमिनीवर झोपू नये,शेतात किंवा वनात हिरवे मऊ गवत दिसले की बऱ्याच जणांना थोडे वेळ लोळायला गम्मत वाटते ,साप आणी गवत यांची एक अन्न साखळी असते हे लक्षात घेता सावधानता राखावी.           
२)घरात भिंतीला टेकून झोपू नये.साप भिंतीला लागून प्रवास करतात कारण एका बाजूने त्यांना संरक्षण लाभते व दुसरे म्हणजे भिंतीवर पाली,नागतोडे,रातकिडे व इतर कीटक सहज नेहमीच बसलेले असतात. कॉट सुद्धा भिंतीस टेकुन नसावा.                      
3) घराच्या भिंतींना भेगा नसाव्यात व त्या बुजून टाकाव्या.    
 4) गटार तुंबलेल्या असू नये,त्यात बेडूक व इतर जलचर  वावरतात व त्यामुळे नाग ,धामण व दिवट सारखे साप तिथे येतात.     
 5) घरात झोपतांना मच्छर दाणी वापरावी ,त्यामुळे डास व साप दोन्ही चावणार नाही. 
 6) मण्यार हा भारतातील सर्वात जास्त विषारी साप आहे. तो निशाचर म्हणजे रात्री सक्रिय असतो.पाल,बेडूक,उंदीर व इतर लहान साप हे त्याचे खाद्य.हा साप ऊबदार पणा लाभावा म्हणून अंथरुणात लपून बसण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.थोडक्यात अंथरूण व्यवस्थित पाहून पाय पसरावे. मण्यार  काळपट ,निळसर रंगाचा असल्याने याच रंगाचे जर ब्लँकेट किंवा तत्सम अंथरून असरळ तर अंधारात कळत नाही व दंषाच्या घटना घडल्या आहेत.       
7)वनात ,शेतात जातांना नेहमी बूट वापरावा ,अंग पूर्ण झालेलं असे कपडे परिधान करावे, डोक्यावर जाडसर टोपी असावी.सोबत काठी ही असावी व एकटे न जाता सोबत कोणीतरी असावे.रात्री च्या वेळी टॉर्च सोबत असावी.    
                            
  (4) *पंचमीला पुजले जातात ऐरवी मारले जातात.....माणसं अशी का करतात.... आज देव करतात तर उद्या जीव घेतात  @चला सापांचे रक्षण करू ,पर्यावरण समृध्द करू--@  आता सर्प हत्या होऊ नये ,साप मानवी वस्तीत न येता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ते रहावे,यासाठी प्रयत्न करूयात.

                                      संकलन -विलास(भाई )महाडीक
           


कार्याध्यक्ष- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी निवड जाहीर