जागतिक पर्यावरण दिन व वाढते तापमान
५ जून जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी हा दिन येतो, आपण पर्यावरण प्रेमी या दिवशी काही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण किंवा इतर नागरिकांमधून पर्यावरणाची जनजागृती करीत असतो.2022 चा हा उन्हाळा सर्वात कडक भासला. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसते आहे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. सिमेंट रस्ते,अपार्टमेंट यांची बांधकामे ही तर तापमानात भर घालणारी साधने आहेत. सकाळी ८-९ वाजल्यापासूनच घराबाहेर पडावेसे वाटत नाही.रस्ते तापण्यास सुरुवात होते. हे सर्व आधुनिकीकरण करीत असताना झाडांची कत्तल काही कमी होत नाही. कोकणातून होणारे ४ पदरी हायवे यासाठी तर झाडांची कत्तल काही विचारू नका.ज्या हद्दीपर्यंत ठेकेदाराला झाडे तोड करण्यास सांगितले जाते त्या हद्दीबाहेरील मोठी झाडे तोड करून नेत आहेत.काय म्हणावे या हव्यासाला?
विकास करणे म्हणजे झाडे तोडून तेथे चकाचक सिमेंट रस्ते,अपार्टमेंट बांधणे नव्हे. माणूस पण असा लहरी आहे ही गर्मी वाढली की झाडे कमी झालीत,जंगले कमी झालीत अस म्हणतील पण पावसाळ्यात आपण आपल्या हाताने १ तरी झाड लावूया अस म्हणून झाड लावणार नाहीत.आपण स्वतःला विचारा की आता किती वर्षांचा आहे व आयुष्यात किती झाडे लावली?आपण जनजागृती चांगली करीत असतो, वृक्षारोपणचे कागदावर आकडे मोठे असतात प्रत्यक्षात कार्यवाही कमी प्रमाणात होते. कारण पावसाळा संपल्यावर वृक्षारोपण चे काय झाले ही विचारणारी यंत्रणा शांत होते.दिनांक ४ जून ते ६ जून २०२२ एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांचा अभ्यास दौरा निमित्ताने बारामती शहरात पाऊल टाकले आणि आम्ही रस्ते,रस्त्याच्या कडेला नियोजन पूर्ण लावलेली मोठी झाडे पाहिली ,पर्यावरण प्रेमी तर आपण स्वप्नात तर नाही ना?असा भास होईल.सिमेंट, डाम्बरी रस्ता झाडे असल्याने तापत नाही,त्यामुळे तापमान वाढत नाही.आपण जर जगातून आलेल्या बातम्या पाहिल्या तर तापमान वाढीचे काय परिणाम आपणास भोगावे लागतील याची कल्पनाच न केलेली बरी.आपण आता तरी शहाणे होऊ या असलेली झाडे कशी वाचविता येतील,नवीन झाडे लावून कशी जगविता येतील याचा शासन स्तरावर विचार होणे गरजेचे आहे.
1) *उष्णतेच्या लाटेने बिहारमध्ये 184 मृत्यू ! गयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली दिवसा संचारबंदी !*
https://www.indiatoday.in/india/story/bihar-heatwave-kills-184-people-section-144-imposed-in-gaya-1550457-2019-06-172) *2003 मध्ये युरोपात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे 35000 लोक मरण पावले होते.*
3) *जगातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये भारतातील 8 शहरे ! 2 शहरांत 50℃ तापमान पार केले. 50℃ च्या वरील तापमानात मानवी शरीरात बिघाड सुरू होतो*
4) *कुवेतमध्ये सर्वाधिक 63℃ तापमानाची नोंद.*
5) *ऑस्ट्रेलियात जानेवारी-2019 मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेत हजारो घोडे-कांगारू व पक्षी मरण पावले.*
6) *उष्णतेच्या लाटांचे भारतातील प्रमाण*
दहा वर्षांपूर्वी - वर्षाला 20 उष्मालाटा
आत्ता - दरवर्षी 500 हून अधिक
*(म्हणजे 2500% वाढ)*
*मित्रहो, WMO ने 2017 साली जाहीर केले की तापमानवाढ आता irreversible अपरिवर्तनीय झाली आहे. आता दरवर्षी हे तापमान वाढतच जाणार.*
राजकारण–धर्मकारण–IPL-वर्ल्डकप-इलेक्शन-बॉलिवूड यांच्या नशेतून 2 मिनिटे वेळ काढा आणि वाचा... *का हे तापमान आता दरवर्षी वाढतच जाणार आणि मृत्यूंची संख्या सुद्धा !*
हरितगृह वायू(ग्रीन हाऊस गॅस) हे यामागचे प्रमुख कारण आहे. 'कार्बन डाय ऑक्साईड' 'मिथेन' 'नायट्रोजन आॅक्साईडस्' 'पाण्याची वाफ' 'क्लोरोफ्लुरोकार्बन्स' यांना हरितगृह वायू म्हणतात. सूर्यापासून पृथ्वीवर येणाऱ्या उर्जेपैकी साधारण 35% ऊर्जा ही पृथ्वीकडून परत पृथ्वीबाहेर फेकली जाते-परावर्तित होते. हरितगृह वायूंमुळे बाहेर पडू पाहणारी बरीचशी ऊर्जा वातावरणात अडकून ती वातावरण अधिक गरम करू लागते. परावर्तित होणारी सूर्याची उष्णता या वायूंमध्ये शोषून घेतली जाते.
हरितगृह वायूंपैकी *कार्बनडाय ऑक्साईड CO2 हा वातावरणात पुढील 600 ते 1000 वर्षे तसाच राहतो...उष्णता शोषून घेत राहतो... वातावरण तापवत राहतो.*
*2009 मध्ये 1000 कोटी टन CO2 आपण हवेत सोडला; त्यापैकी 400 टन हा झाडे व समुद्री हरितद्रव्याकडून शोषून घेतला. बाकी 600 कोटी टन CO2 पुढील शेकडो वर्षे वातावरणात राहून वातावरण अधिक उष्ण बनवत राहणार.*
_*इथून पुढे दरवर्षी मानवजातीचा तथाकथित विकास(?) अधिकच वेगवान झाला. जगातल्या सर्व सरकारांनी प्रदूषण, या वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे वचन-पॅरिस कराराद्वारे जगाला दिले.*_
*2018 साली, एका वर्षात आपण 3800 कोटी टन CO2 वातावरणात सोडला. जगभरात दर मिनिटाला 70 एकर जंगल नष्ट होत असले तरी आपण 400 कोटी टन CO2 झाडांनी व समुद्री हरिद्रव्याकडून शोषून घेतला असे मानूया. उरलेला 3400 कोटी टन CO2 आता पुढील किमान 600 ते 1000 वर्षे वातावरणात राहून तो तापमान आणखीन वाढवत नेणार...*
हे आकडे फक्त 2009 व 2018 या दोन वर्षाचे झाले ! ग्लोबल वॉर्मिग कमी व्हावे यासाठी मागील 30 वर्षांत 26 परिषदा झाल्या, त्याचे फलित इतकेच की हे वायूंचे उत्सर्जन आपण दरवर्षी वाढवतच आहोत. थोडक्यात काय तर पेट्रोलियम कंपन्या, उद्योगपती व त्यांच्या प्रभावाखालील सर्व देशांची सरकारे ह्यांना जीवसृष्टी पेक्षा नफा/अर्थव्यवस्था महत्त्वाची वाटते आहे. मानवी अस्तित्व संकटात आले तरी पैसा व सत्ता यांची नशा उतरायला तयार नाही.
आता इतर हरितगृह वायूंबद्दल जाणून घेऊया.
*) *मिथेन वायू* हा CO2 पेक्षा 25 पट जास्त नुकसान करतो. या वायूचे वातावरणातील आयुष्य-12 वर्षे !
*) *नायट्रोजन ऑक्साईड* हा CO2 पेक्षा 300 पट धोकादायक आहे. या वायूचे वातावरणातील आयुष्य- 110 वर्षे !
*) *क्लोरोफ्लुरोकार्बन्स (CFC)-* CO2 पेक्षा 10000 पट धोकादायक, या वायूचे वातावरणातील आयुष्य 500 वर्षे !
*) *हेक्झाफ्लुरोकार्बन्स (HFC)-* CO2 पेक्षा हजारो पट धोकादायक, या वायूचे वातावरणातील आयुष्य 14 वर्षे !
*) *SF6 सल्फर हेक्झाफ्लोराइड-* CO2 पेक्षा 23500 पट धोकादायक, या वायूचे वातावरणातील आयुष्य 1000+ वर्षे !
*) पाण्याची वाफ
*) ओझोन
_*कशामुळे हे वायू तयार होतात? किंवा कशासाठी हे वायू आपण वापरतो?*_
*) *कार्बनडाय ऑक्साईड*
-नैसर्गिकरित्या (श्वसन, पचन, ज्वालामुखी, कुजण्याची प्रक्रिया,. इ.),
-अनैसर्गिक/मानवीय कारणे जसे की वीजनिर्मिती(कोळसा जाळून,..ते अणुभट्टी), लोह-स्टील उद्योग, सिमेंट उद्योग(बिल्डिंग,रोड), पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल,डिझेल,LPG/घरगुती गॅस, रॉकेल/केरोसीन, डांबर, प्लास्टिक,..इ), शेत काडी कचरा जाळणे,...इ. इ.
*) *मिथेन-* मानवीय (पेट्रोलियम पदार्थ निर्मिती व वहन,मांसाहार व डेअरी साठी पशुपालन, कचऱ्याचे ढीग, बायोमास ज्वलन, बायोफ्युएल,... इ.
*) *नायट्रोजन ऑक्साईडस् NOx -* जीवाश्म इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस,रॉकेल,...इ) चे ज्वलन.
*) *क्लोरोफ्लूरोकार्बोन्स CFCs-* (फ्रिज, एसी, पॅकिंग मटेरियल,... इ)
*) *हेक्झाफ्लुरोकार्बन्स (HFC)-* रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग (AC), बिल्डिंग इन्सुलेशन, अग्निशामक यंत्रणा आणि एरोसोल.
*) *SF6 सल्फर हेक्झाफ्लोराइड-* इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये इंशुलेटर म्हणून मोठ्या प्रमाणात वापर, सर्किट ब्रेकर, स्विच गियर,..इत्यादी अनेक साधनांमध्ये वापर.
*ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केला आहे. दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या हिरोशिमा बेचिराख करणाऱ्या अणूबाँब स्फोटाच्या वेळी निर्माण झालेली उष्णता हे एक युनिट/एकक(unit) मानुया. आपण हरितगृह वायूंमुळे वातावरणात निर्माण केलेल्या उष्णतेचा आपल्याला अंदाज येण्यासाठी हा रिपोर्ट सांगतोय की,*
*1) ही उष्णता इतकी आहे की मागचे 150 वर्षे दर सेकंदाला जणू एक हिरोशिमा साईजचा अणुबॉम्ब फोडला आहे.*
*2) 1990 ते 2015 यादरम्यान निर्माण केलेली उष्णता ही म्हणजे ह्या 25 वर्षात जणू दर सेकंदाला 3 अणुबॉम्ब फोडले आहेत.*
*3) आत्ता दररोज वातावरणात सोडली जाणारी उष्णता म्हणजे जणू दररोज 5 लाख अणुबॉम्ब फोडले आहेत...दररोज 5 लाख!*
*इतक्या उष्णतेमुळे आपण जळून राख झालो असतो पण तरीदेखील आपण वाचलो आहोत ते समुद्रांमुळे ! यातील बहुतांश उष्णता समुद्र शोषून घेत आहेत. पण आता त्यांची सहनशक्ती संपली आहे. इतकी प्रचंड उष्णता शोषल्यामुळे आता उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फखंड वितळत आहेत. समुद्राखालील व बर्फाखालील गोठलेले मिथेनचे साठे अजून मोकळे होतील तर हाहाकार उडेल. हजारो वर्षे न वितळलेल्या बर्फाखालील सूक्ष्मजीव, व्हायरस मोकळे होत आहेत. हे सूक्ष्मजीव ऍक्टिव्ह होऊन माहीत नसलेले रोग वेगाने फैलावण्याची भीती आहे. ह्या उष्णतेमुळे जे ह्या शतकाच्या अखेरीस होईल असे शास्त्रज्ञांना वाटत होते ते मागील महिन्यात घडले.*
https://www.theguardian.com/environment/2019/jun/18/arctic-permafrost-canada-science-climate-crisis
*आपला वायू उत्सर्जनाचा वेग असाच वाढता राहिला तर पुढील काही वर्षात दक्षिण-उत्तर ध्रुवावरचे सर्व बर्फ वितळेल...समुद्राच्या पाण्याची पातळी 225 फूटापर्यंत वाढेल-किनाऱ्यावरील सर्व शहरे बुडतील.*
*गेले काही दशकं शास्त्रज्ञ हे इशारे देत आहेत. पण आपण दुर्लक्ष करत आहोत. 'युनो'ने मे 2019 ला दिलेल्या रिपोर्टनुसार मानवाच्या ह्या विनाशकारी कृत्यांमुळे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत!...सध्या दररोज सुमारे 150 प्रजाती नष्ट होत आहेत. निसर्गाचा तोल बिघडल्याने अनेक घटनांची चेन रिऍक्शन सुरू होऊन मानवाला सावरण्याची संधी मिळणार नाही असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. अतिवृष्टी-दीर्घ दुष्काळ, प्रचंड गारपीट, ढगफुटी, वादळे, चक्रीवादळे, पूर-प्रलय, हिट-व्हेव, साथीचे रोग अशा घटना आधीच सुरू झाल्यात. आता त्याचा वेग वाढतच जाणार...*
*कार्बनडाय ऑक्साईडची धोक्याची 400 ppm पातळी आपण 2013 सालीच ओलांडली आहे. 1 ppm म्हणजे 780 कोटी टन CO2. म्हणजे 2018 साली 4 ppm वाढले.(नैसर्गिक वेग 1 ppm दर 10000 वर्षाला. आदर्श पातळी 300ppm असायला हवी). याचा अर्थ, आत्ता याक्षणी जरी आपण हरितगृह वायू निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टी थांबवल्या, म्हणजे वीज निर्मितीचे कारखाने-कार-ट्रक-विमाने-एसी-सर्व कारखाने-सिमेंट वापर..इ.इ. तरीदेखील आधीच साठलेल्या प्रचंड वायूंमुळे ह्या विनाशकारी घटना घडणारच आहेत. तरी आपण हे थांबवणे सोडाच पण ह्या वायूंचे उत्सर्जन वाढवतच आहोत. दुर्दैवाने उत्सर्जन बंद करण्याची अवस्था आली असताना सर्व सरकारे 2050 पर्यंत उत्सर्जन कमी करू असं म्हणताहेत.*
जगातील सर्व सरकारे GDP ग्रोथच्या मागे आहेत. GDP ग्रोथ म्हणजे वस्तू निर्माण करण्याचा वेग अधिक वाढवणे. त्यासाठी आणखीन कारखाने, अधिक वीज, अधिक कच्चा माल, अधिक खाणी, अधिक खनिजे,...जंगल-नदी-डोंगर सगळ्याचे आणखीन लचके तोडायचे. निवडून आल्यावर 5 वर्षात GDP वाढ नाही दाखवली तर पुढील निवडणूक आपण हारू ही त्यांना भीती आहे. त्यामुळे हरितगृह वायू कमी करण्याऐवजी ते वायू वाढवणाऱ्या नवीन उद्योगांना ते परवानगी देत आहेत. नवीन रोजगार निर्माण होत आहेत हा भ्रम आहे. रोबोट्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे असलेले रोजगार कमी होत आहेत-होणार आहेत. गरीब-श्रीमंत दरी वाढतच जाणार आहे.
* जगातील CO2 चे 71% उत्सर्जन हे फक्त 100 कंपन्यांकडून होत आहे. जगाच्या 10% श्रीमंतांकडून 50% हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत आहे.*
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लहान शाळकरी मुलाला जरी विचारले तर ते मूल सांगेल की *"आपले जगणे/अस्तित्व जर धोक्यात आले आहे तर आधी ते हरितगृह वायूंचे उत्सर्जन पूर्ण थांबवा. दिशा चुकली आहे तर तातडीने ब्रेक लावा व यू टर्न घ्या. घराला आग लागली असताना त्याच घरात बसून चर्चा कसली करताय-- आधी आग विझवा-- आधी आग भडकवणाऱ्या गोष्टी बंद करा*
*कॉमन सेन्स हेच सांगतो.*
*पण लक्झरी लाइफस्टाइलची सवय हे करू देत नाही. आपल्याला आपल्या अस्तित्वापेक्षा अर्थव्यवस्था जास्ती महत्त्वाची झाली आहे. लक्षात घ्या आपल्या आधीच्या पिढ्या निसर्गाला अनुकूल जीवन लाखो वर्षे जगत होत्या.*
*न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसींडा यांचे साऱ्या सजीव सृष्टीकडून आभार ! त्या जगातल्या पहिल्या पंतप्रधान आहेत ज्यांनी 27 मे19 ला जाहीर केले की त्यांचा पुढील अर्थसंकल्प हा GDP वर आधारित नसेल. ही समझ व धाडस त्यांनी दाखवले.*
*उरलेले पंतप्रधान हे धाडस तेंव्हाच दाखवतील जेंव्हा आपण सर्व एकसुरात सांगू की,*
*'आम्हाला GDP वर आधारित अर्थसंकल्प नको'*
*'लाइफस्टाइल पेक्षा लाइफ महत्त्वाचे!'*
प्रॉब्लेम जगव्यापी आहे-अभूतपूर्व आहे-अनेक आघाड्यांवर बदल मागणारा आहे. कम्फर्ट झोन जाईल, पण जीवन वाचेल. जुन्या व्यवस्था जातील, हळूहळू नवीन तयार होतील.
*हे सर्व वाचून हतबल होऊ नका.*
*1) हरितगृह वायू वाढवणाऱ्या वस्तूंचा वापर कमीत कमी करा- वीज-पेट्रोल-...इ. आपले कार्बन फूटप्रिंट कमी होईल.*
*2) पर्यावरण पूरक विकासाची धोरणे राबवायला हवीत. याची मागणी करण्यासाठी जगभर लोक एकत्र येत आहेत. 15 वर्षांच्या मुलीने(ग्रेटा थनबर्ग) सुरू केलेल्या FFF (Friday For Future) जनजागृती अभियानात, गेल्या 10 महिन्यात 16 लाख मुले सामील झालीत. यामुळे जागृती होऊन बदल सुरू झाला आहे. आपणही एकत्र आलो तर बदल घडवून आणू शकतो. आता गाफील राहिलो तर आपले अस्तित्व धोक्यात येणार आहे हे विसरून चालणार नाही.
संकलन-विलास(भाई)महाडीक
पर्यावरण प्रेमी
Comments
Post a Comment