चला निसर्ग जपूया !!!

             कोरोना लॉकडाऊन मध्ये सर्व जनतेला घरात नजर कैदेत ठेवल्यासारखं वाटत आहे. स्वतः जवळ सर्व साधने असूनसुद्धा माणूस एकाकी झाला आहे. मला वेळ नाही असे म्हणणारे आता हे सर्व दिवस कसा घालवू ,काय करू अशा चिंतेत आहेत.हा लॉकडाऊन केव्हा संपतो याची वाट पहात आहेत.
आपल्या पंतप्रधान मान.मोदी साहेब,मुख्यमंत्री मान.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून जनतेला काही दिवस घरात बसण्याचे सारखे आव्हान करीत आहेत.सर्व शासकीय यंत्रणा आपल्या जनतेच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत.तरीही काही हौशी मंडळी बाजारात गर्दी करीत आहेत.हे ही दिवस जातील.आपण प्रशासन सांगेल त्याप्रमाणे  ऐकू या.
           ह्या कोरोना लॉकडाऊन मुळे पर्यावरण सुद्धा बरेच सुधारण्यासाठी मदतच होत आहे. खेडे गावात रस्ते मोकळे आहेत त्यामुळे जंगलातील प्राणी सध्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.रस्त्यावर कोणतेही वाहन नाही.ट्रेनची धडधड नाही. पक्ष्यांच्या किलबिलाट स्पष्ट ऐकू येतो आहे. पक्षी बिनधास्त पणे विहार करताना दिसत आहेत.ध्वनी प्रदूषण नाही, गाड्यांच्या धुरापासून सर्व भारत सध्या प्रदूषण  मुक्त आहे, नद्या सुध्दा मुक्त श्वास घेत आहेत.जलप्रदूषण सुद्धा कमी झाले आहे. रस्त्यावर प्लास्टिक दिसत नाही.या कोरोना व्हायरस ने माणसाला बरेच काही शिकविले आहे. काहीही असो पर्यावरणच्या दृष्टीने कोरोना लॉकडाऊन महत्त्वाचे ठरत आहे असे वाटते.
    लॉकडाऊन संपल्यावर सर्वांनी निसर्गाचा आदर करून सर्व बाजूने होणारे प्रदूषण कमी करूया.

 वाशिष्ठीने घेतला मोकळा श्वास...

स्वच्छंद विहार....


वाशिष्ठी नदी

वाशिष्ठी नदी

           विलास (भाई) महाडीक.
                    कार्याध्यक्ष
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र.
९४२२३७६४३५


तरुण भारत वृत्तपत्र दिनांक ०३ एप्रिल २०२० रोजी प्रकाशित झालेले छायाचित्र.



तरुण भारत वृत्तपत्र दिनांक ०३ एप्रिल २०२० रोजी प्रकाशित झालेले छायाचित्र



Comments

  1. मला वाटतं हे प्रत्येक व्यक्तीने शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन देशहितासाठी सहकार्य करावे.

    आणि पर्यावरणाचे संरक्षण हे प्रत्येकाने केलेच पाहिजे.
    हे आपले आद्य कर्तव्य आहे.

    ReplyDelete
  2. सुरुवात छान झाली. अभिनंदन.

    ReplyDelete
  3. धन्यवाद, राजू शिंदे (तरुण भारत )

    ReplyDelete
  4. भाई छान सुरूवात आहे .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

विनाशाच्या उंबरठ्यावर- एक मखमली सौंदर्य अन जैवविविधता- *मृगाचा किडा..rain bug, रेन बग

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म