Posts

Showing posts from September, 2026

जागतिक पर्यटन दिना निमित्त

Image
27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. चिपळूण तालुका रत्नागिरी जिल्हयातीलच नव्हे तर कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे. संपूर्ण क्षेत्रात आघाडीवर असणारे चिपळूण शहर आहे. सर्वधर्म समभावाचा सुरेख संगम चिपळूण तालुक्यामध्ये पहावयास मिळतो. चिपळूण मधील पर्यटन  1) ओवळी येथील मंदिर- मंदिर व देवळासभोती असणारी देव किंजळ झाडाची वनराई पहाण्या सारखी आहे. उंच निलगिरी सारखी सरळ वाढणारी झाडे ही झाडे फक्त या देवळाच्या परिसरात आहेत, बाहेर ही झाडे होत नाहीत असा गावकर्यांचा विश्वास व श्रद्धा आहे. 2) चिपळूण जवळील कळकवणे गावाशेजारी दादरचे श्रीराम-वरदायिनी मंदिर- दादर येथील श्रीदेवी रामवरदायिनीचे मंदिर भव्यदिव्य आणि देखणे आहे. जयपूर हून रामवरदायीनी, श्री वाघजाई देवी आणि श्री महिषासुरमर्दीनी यांच्या मूर्ती आणल्या आहेत देवींच्या घडविलेल्या मूर्ती, बारा íज्योतिर्लिंगांचे दर्शन, डोळे दिपवणारे रंगकाम, मंदिर परिसरातील देवराई, उद्यान वैशिष्ट्यपूर्ण आहे. 3) तिवरे येथील गंगाकुंड - तिवरे गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागात, खडकाळ नदी प्रव...

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म

Image
 *गणेश पूजनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पत्री  (पानाबद्दल) काय म्हणते आपले आयुर्वेद? काय आहेत याचे फायदे ते पहा.                   या निमित्ताने आपण हे झाड समजून घ्याल व त्याची लागवड कराल अशी अपेक्षा आहे.                          २१ प्रकारच्या वनस्पतींची नावे -१)मधुमालती २)माका ३)बेल ४)दुर्वा ५)शमी ६)विष्णुकांत ७)आघाडा  ८)मंदार (रुई ) ९)तुळस १०)केवडा ११)जाई १२)बोर १३)धोत्रा १४)डोरली १५)कण्हेर १६)अर्जुन सादडा १७)डाळिंब  १८)मरवा १९)देवदार २०)पिंपळ २१)अगस्ती    खालील दिलेले उपचार तज्ञ व्यक्ती किंवा आयुर्वेद उपचार करणाऱ्या तज्ञाकडून प्रमाण व  पध्दत समजून घ्या.  *१. अगस्ती(हादगा)*              प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असते.  'अ ' जीवनसत्त्वाचे वनस्पतीज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यू...