खाज कुहिली उपयोग व गुणधर्म

 

(निसर्गतः  5 हजार वर्षांपासून आयुर्वेदात 'कवच ,कपीकच्छु ,आत्मगुप्त आदी नावाने ही खाज कुहिली वनौषधी परिचित आहे.पुरुषार्थ वाढवणारी बलवर्धक असणारी हे कवच बीज मानवासाहित माकड,वानर यांना ही प्रिय आहे हे विशेष.)
                        -गैरसमज व भीतीपोटी सर्व परिचित असलेली खाज कुहीली (कवच)ची वेल आता बांधावरून दिसेनाशी होत आहे.वाळलेल्या शेंगा वर बारीक लव असते ज्यास चुकून स्पर्श झाला की अंगास प्रचंड खाज येते ,या एकमेव गुणधर्मामुळे शेतकरी वा ज्यांच्या कुंपणावर ही वेल उगते ती  वेल नष्ट करण्याचा कल ग्रामीण भागात वाढत आहे व याचा परिपाक आता हे आरोग्यदायी कवच च असुरक्षित झाले आहे.निसर्गतः  5 हजार वर्षांपासून आयुर्वेदात 'कवच ,कपीकच्छु ,आत्मगुप्त आदी नावाने ही वनौषधी परिचित आहे.पुरुषार्थ वाढवणारी बल वर्धक असणारी हे कवच बीज मानवासाहित माकड,वानर यांना ही प्रिय आहे हे विशेष.या वनस्पतीच्या शेंगा मधील काळे बिज हे 100हुन अधिक आयुर्वेदिक औषधांत वापरतात.पूर्वीच्या काळी राजे महाराजे बलवान होण्यासाठि तर ऋषी ,मुनी, ओज शक्ती वाढवण्यासाठी तर  पैलवान  बलदंड शरीर कमविण्यासाठी खाज कुहीली चे बीज विविध स्वरूपात सेवन करत असत.याच कवच अर्थात खाज कुहीली च्या बियांचा " *सेगमेंटल व्हिटीलिगो* या  मज्जासंस्थेच्या कार्यात बिघाड उत्पन्न होऊन त्वचेवर उमटणाऱ्या पांढऱ्या डागांवर  सिल्लोड येथील डॉ.संतोष पाटील यांनी 4 वर्षे यशस्वी  संशोधन केले असून एफिकसी ऑफ मुक्यूना प्रूरीइन्स इन सेगमेंट्सल व्हिटीलिगो"-efficacy of mucuna prurience in segmental vitilgo  हा शोध निबंध-रिसर्च पेपर   प्रकाशना साठि  इथनो बॉटनि या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्धी साठी सादर करण्यात आला आहे.जगातील या विषयावरचे  पहिलेच संशोधन असून या वनस्पतीच्या उपयुक्तते बद्दल अजून एक मानाचा तुरा यात रोवला जाणार आहे व भविष्यात अनेक संशोधकांना ही भारतीय वनस्पती नक्कीच आकृष्ट करेल.विशेष म्हणजे कॉमन सेलर या फुलपाखराचा जीवनक्रम च या वेलीवर अवलंबून असून ते खाज कुहिली वनस्पतीच्या पानावर अंडी घालते.                             
   *---सद्या जिम मध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जात असतो .स्नायू ,बॉडी बिल्डिंग साठि घातक स्टेरॉईड घेण्या ऐवजी कचक बीजा पासून बनलेले बलवर्धक औषध सेवन करणे अधिक हितकारक*                       
                *आयुर्वेदात आत्म गुप्त अशा नावाने उल्लेख असलेल्या या वेलिचें बीज शांत झोप आणणारे असे उचित वर्णन आहे.नैसर्गिक झोप आणणारा गुणधर्म हा अनेक मनोविकारात  उपयोगी आहे.                                                                                                                       कवच पाक,वानरी गुटी आदी औषधं यांपासून बनतात. 


1



असाध्य समजल्या जाणाऱ्या पार्किन्सन डिसिस या मेंदू च्या आजारात   'लेवाडोपा'* 'हे औषध वरदान ठरलेले आहे,हेच लेवाडोपा नैसर्गिक रित्या कवच बीज मध्ये मुबलक आढळते.या वनस्पतीच्या जतना बाबत डॉ.पाटील हे शेतकऱ्यांना याचे वनजागर या उपक्रमातून महत्व पटवून देऊन आता कुंपणावर बीज पेरणी ही करत आहेत.

                      @डॉ. संतोष पाटील-सिल्लोड ,औरंगाबाद @

Comments

Popular posts from this blog

कोणत्या झाडाचा उपयोग कोणते पक्षी कसा करतात?

गणपतीच्या पुजनासाठी लागणाऱ्या २१ प्रकारच्या वनस्पतींची पत्री ( पाने )त्यांचे औषधी गुणधर्म